‘बिग बॉस’चा १७ वा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉसमधील प्रत्येक स्पर्धकाने आपल्या खेळीवर वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे. ‘पवित्र रिश्ता’फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेही आपला पती विकी जैनबरोबर ‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वात सहभागी झाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अंकिता लोखंडे आणि विक्की जैन यांच्यासंदर्भात एक वेगळीच चर्चा रंगल्याचं बघायला मिळत आहे. बिग बॉसच्या घऱात अंकिता गुडन्यूज देणार असल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा- बाल्कनीत पडले अन् उपचारादरम्यान झालं निधन; प्रसिद्ध अभिनेत्री वडिलांच्या आठवणीत भावुक, म्हणाली…
काही दिवसांपूर्वीच अंकिताने बिग बॉसच्या घरात प्रेग्नन्सी टेस्ट केली होती. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एवढंच नाही तर तिला आंबट खावसं वाटतंय असंही ती म्हणाली होती. अभिनेत्रीच्या या विधानानंतर अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते. आता अंकिता खरच गरोदर आहे की नाही, याबाबतचा खुलासा नावेद सोलने केला आहे. नुकतंच नावेदचे बिग बॉसमधून एलिमिनेशन झाले, पण बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर नावेदने अनेक खुलासे केले आहेत.
अंकिता लोखंडेच्या गरोदरपणावरही नावेदने भाष्य केलं आहे. नावेद म्हणाला, “सध्या सगळं काही सकारात्मक दिशेने जात आहे. मी याबद्दल खूप उत्सुक आहे. अंकिताने मला वचन दिले की, ती तिच्या बाळाचे नाव ठरवताना माझी मदत घेईल. अंकिताच्या बाळासाठी आम्ही हिंदी आणि पाश्चिमात्य नावांचे मिश्रण करून नवीन नावाची निर्मिती करणार आहोत. माझ्या मनात काही नावे आहेत, पण योग्य वेळ आल्यावरच मी ती शेअर करेन.”
हेही वाचा- Bigg Boss 17: अंकिता लोखंडेने पती विकी जैनला सर्वांसमोर फेकून मारली चप्पल, नेमकं काय घडलं?
या महिन्याच्या सुरुवातीला बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये अंकिता तिचा पती विकी जैनसोबत तिच्या मूड स्विंगबद्दल बोलताना दिसली होती. अंकिता म्हणाली होती, “मला वाटतं की मी आजारी आहे, मला आतून जाणवत आहे की माझी तब्येत बरी नाही. मला मासिक पाळी येत नाहीये. मला घरी जायचे आहे; एवढंच नाही तर अंकिताने बिग बॉसच्या घरात प्रेग्नन्सी टेस्टही केली होती.