रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चे १७ वे पर्व सुरू आहे. या पर्वात अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन, नील भट्ट व त्याची पत्नी ऐश्वर्या शर्मा, मुनावर फारुकी असे अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी झाले आहेत. या यादीत आणखी एक नाव आहे ते म्हणजे अभिनेत्री रिंकू धवन होय. टीव्ही मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारून लोकप्रियता मिळवणाऱ्या रिंकूच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं बिग बॉसबद्दलचं विधान चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंकिता लोखंडेची सुशांतशी ब्रेकअपनंतर झालेली ‘अशी’ अवस्था, म्हणाली, “मी विकीला म्हणायचे की तो…”

रिंकू धवनने टीव्ही अभिनेता किरण करमारकरशी लग्न केलं होतं. १५ वर्षांच्या संसारानंतर दोघे विभक्त झाले. किरण यांना बिग बॉसची ऑफर मिळाली असून ते शोमध्ये सहभागी होती अशा चर्चा होत्या. पण या चर्चा किरण यांनी फेटाळल्या आहेत. ‘इ टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार किरण म्हणाले, “या सर्व चर्चा केवळ अफवा आहेत. मला बिग बॉसची ऑफर आलेली नाही आणि मी कधीही त्याचा भाग होणार नाही. मी हा शो कधीच पाहिला नाही. या शोमध्ये काय घडते याबद्दल मी ऐकलंय पण कधीच पाहिला नाही.”

दीपिका पदुकोणला ‘त्या’ विधानावरून ट्रोल करणाऱ्यांना करण जोहरने सुनावलं; म्हणाला, “तुम्हाला जे करायचंय ते…”

रिंकू धवनचा उल्लेख करत किरण पुढे म्हणाले, “रिंकूने जेव्हा या शोचा भाग व्हायचं ठरवलं तेव्हा तिने जाण्यापूर्वी मला फोन केला. ती आणि मी एकाच सोसायटीत राहतो. आमचा मुलगा दोन्ही घरांमध्ये सतत ये-जा करत असतो म्हणून तिला मला कळवायचं होतं की ती थोड्या काळासाठी दूर असेल. मी तिला शुभेच्छा दिल्या. माझा मुलगा स्वतःच्या आवडी जोपासतोय, त्यामुळे त्यालाही बिग बॉसच्या घरात काय चालले आहे याची जाणीव नाही.”

“अनेक महिने घरात कोंडून राहून लोकांशी भांडणं करण्यापेक्षा पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. ‘मी शोचे अनेक सीझन पाहिले आहेत आणि शोमध्ये माझा गेम कसा खेळायचा हे मला माहीत आहे,’ असं अनेक सहभागी स्पर्धक म्हणतात. पण ते कोणत्या खेळाबद्दल बोलत आहेत हे मला माहीत नाही. मी कुणाचा अपमान करण्याचा प्रयत्न करत नाही. पण मला फॉरमॅट समजत नाही. मी एक साधा माणूस आहे आणि मला फक्त अभिनय आणि लोकांचे मनोरंजन कसे करावे हे माहित आहे. मी उद्या पैसे कमवण्यासाठी एखादा स्टॉल सुरू करू शकतो, पण जर तुम्ही मला घरात बंद करून लोकांवर ओरडण्यास सांगितलं तर ते मला जमणार नाही,” असं किरण करमारकर म्हणाले.