छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस’चं १७ वं सध्या जोरदार सुरू आहे. या पर्वात सुरुवातीपासून भांडणं, शिवीगाळ असं सर्व काही पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या पर्वात दोन आठवडे होताच वाइल्ड कार्ड एंट्री झाल्या आहेत. अभिनेत्री व पूर्वाश्रमीची मिस इंडिया मनस्वी ममगई आणि इशा मालवियाचा सध्याचा बॉयफ्रेंड, अभिनेता समर्थ जुरेल या दोघांची वाइल्ड कार्ड म्हणून एंट्री झाली आहे. या वाइल्ड कार्ड एंट्रीमुळे बिग बॉसच्या घरचं वातावरण तापलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची लोकप्रिय मालिकेत जबरदस्त एंट्री; झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत

एकाबाजूला सध्या बिग बॉस घरात असलेल्या लव्ह ट्रँगलविषयी सर्वत्र चर्चा सुरू आहे. इशा, अभिषेक आणि समर्थ यांच्या लव्ह ट्रँगलमुळे प्रेक्षक मात्र हैराण झाले आहेत. तर दुसऱ्याबाजूला काही कलाकार मंडळी अभिषेकला पाठिंबा देत आहे, तर काही कलाकर इशाला पाठिंबा देताना दिसत आहे. अशातच बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता एल्विश यादवने इशाला जबरदस्त रोस्ट केलं आहे.

हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत येणार नवं वळणं; मुक्ता-सागरच्या मैत्रीच्या नात्याची होणार सुरुवात

एल्विशने काही व्हिडीओ इ्स्टाग्राम स्टोरीला अपलोड केले आहेत. एका व्हिडीओमध्ये एल्विश अभिषेकची नक्कल करताना दिसत आहे. तो म्हणतो की, ‘मी खूप आनंदी आहे. इशाला तिचं प्रेम मिळालं.’ तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये तो म्हणतोय की, ‘भाई, इशा कोणाबरोबरही फिरायला लागली तर, मला खूप जळणं होतेय.’ तसेच तिसऱ्या व्हिडीओमध्ये एल्विश म्हणतो की, ‘मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. इशाने मला धोका दिलाय. मी पण आता बिग बॉस जातोय. इशा मी येतो.’ एल्विशचे हे रोस्टिंग व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – सोनाली कुलकर्णीच्या आई-वडिलांचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण: झळकणार ‘या’ चित्रपटात

हेही वाचा – ‘माझा होशील ना’नंतर विराजस कुलकर्णी व गौतमी देशपांडे पुन्हा झळकणार एकत्र; निमित्त मालिका नव्हे तर….

दरम्यान, इशा, अभिषेक आणि समर्थ लोकप्रिय मालिका ‘उडारिया’मध्ये सहकलाकार होते. या मालिकेदरम्यान इशा व अभिषेकमधील जवळीक वाढली. त्यानंतर दोघं रिलेशनशिपमध्ये आले. पण काही दिवसांतच दोघांचा ब्रेकअप झाला. यानंतर दोघांनी बिग बॉस यंदाच्या पर्वात प्रवेश केला. यावेळी इशाने अभिषेकबरोबर कोणतंही रिलेशन नसल्याचं सांगितलं होतं. तर अभिषेकने याच्या उलट सांगितलं होतं. त्यानंतर घरात दोघं एकत्र दिसले. मात्र आता यामध्ये इशाचा सध्याचा बॉयफ्रेंड समर्थची एंट्री झाल्यामुळे संपूर्ण चित्र पलटले आहे.