Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वाला १५ ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. यंदाच्या पर्वात अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा विकी जैन यांनी सहभाग घेतला आहे. ‘बिग बॉस’ सुरू झाल्यावर अनेकदा अंकिता-विकीमध्ये वाद निर्माण झाले होते. परंतु, सध्या दोघंही एकमेकांना सावरून घेत असल्याचं कार्यक्रमात पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : ओंकार भोजनेच्या मानधनाबाबत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक म्हणाले, “तो स्वतः म्हणाला होता की…”

‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडेचं गेल्या काही दिवसांपासून सतत ऐश्वर्या शर्मा व नील भट्ट या जोडप्याशी भांडण होत आहे. बऱ्याचदा तिचे नवऱ्याबरोबरही वाद होतात. या सगळ्या भांडणाला कंटाळून अंकिता ढसाढसा रडत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता “मला आईकडे घरी जायचंय…” असं बोलताना दिसत आहे. यानंतर विकी जैन अंकिताला जवळ घेऊन तिची समजूत घालत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली…

amruta khanvilkar
अमृता खानविलकर

अमृता खानविलकरने ‘बिग बॉस’च्या घरात तिची लाडकी मैत्रीण भावुक झाल्याचा व्हिडीओ शेअर करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. “अंकिता…माझी बेबी…तू खूप जास्त खंबीर आहेस. पण, तुझ्या सध्याच्या परिस्थितीला मी चांगलंच समजू शकते. तुला खूप प्रेम अंकुडी” असं कॅप्शन अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर करत दिलं आहे.

दरम्यान, अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अमृता खानविलकर फार पूर्वीपासून एकमेकांच्या मैत्रिणी आहेत. अंकिता-विकीच्या लग्नात अमृता सहभागी झाली होती. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबरोबर ब्रेकअप झाल्यावर अंकिताने १४ डिसेंबर २०२२ रोजी विकी जैनशी लग्नगाठ बांधली होती.

Story img Loader