‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. यावेळी विजेतेपदावर आपलं नाव कोण कोरणार? याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर डोंगरीचा मुनव्वर फारुकी यंदाचा विजेता ठरला. तसेत अभिषेक कुमार उपविजेता, तर ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राची बहीण मनारा चोप्रा द्वितीय उपविजेती ठरली आहे. सध्या ‘बिग बॉस’च्या या त्रिकूटावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

‘बिग बॉस’मुळे मनाराचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तिने ट्रॉफीवर नाव कोरलं नसलं तरीही प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे सध्या अभिनेत्रीचे काही जुने व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अशातच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Akshaya Deodhar and Hardeek Joshi
राणादा अन् पाठकबाई पुन्हा एकत्र झळकणार? अक्षया देवधरच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चा, पाहा व्हिडीओ

हेही वाचा : “अजिंक्य माझे पती…”, लग्नात शिवानी सुर्वेने घेतला हटके उखाणा, व्हिडीओ व्हायरल

मनारा ही ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राच्या आत्याची मुलगी असल्याने ती देसी गर्लची चुलत बहीण आहे. या दोन्ही बहिणींनी काही वर्षांपूर्वी एका जाहिरातीसाठी एकत्र काम केलं होतं. सध्या ही जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. यात दोघींचाही काहीसा वेगळा लूक पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करत “मनाराने प्रियांकासारखी प्रगती केली पाहिजे”, “चोप्रा सिस्टर्स”, “दोन्ही बहिणी चांगल्या अभिनेत्री आहेत” अशा कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : सई-सिद्धार्थची रोमँटिक केमिस्ट्री, संवादांची जुगलबंदी अन्…; लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्या ‘श्रीदेवी-प्रसन्न’ची अनोखी कहाणी

दरम्यान, मनारा चोप्राचा जन्म २५ मे १९९१ मध्ये झाला. तिचं खरं नाव बार्बी आहे. तेलुगू चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांमध्ये मनाराने काम केलं आहे. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी मनारा फॅशन डिझायनर म्हणून काम करायची. प्रियांका आणि निक जोनस यांचा विवाह सोहळा २०१८ मध्ये राजस्थानमध्ये पार पडला होता. या सोहळ्यात मनारा सहभागी झाली होती.

Story img Loader