Munawar Faruqui Wins Bigg Boss 17 Season: ‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. यावेळी टॉप ५ स्पर्धकांमध्ये मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे व अरुण या स्पर्धकांनी धडक मारली होती. अखेर अटीतटीचाच्या लढाईत प्रेक्षकांची सर्वाधिक मतं मिळवत शेवटी मुनव्वर फारुकीने विजेतेपदावर नाव कोरलं आहे.

‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून मुनव्वर विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. संपूर्ण सीझन त्याने उत्तम कामगिरी केली होती. ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मुनव्वरला वैयक्तिक आयुष्यातील अनेक चढउतारांचा सामना करावा लागला होता. या सगळ्या संकटांवर मात करत त्याने विजेतेपदावर नाव कोरलं आहे. याआधी मुनव्वर कंगनाच्या ‘लॉक अप’ या शोचाही विजेता ठरला होता.

Ratan Tata Goa Dog dead
Ratan Tata Pet Dog: रतन टाटांच्या निधनानंतर पाळीव श्वान ‘गोवा’ याचाही मृत्यू? व्हायरल मेसेजनंतर मुंबई पोलीस काय म्हणाले?
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
IAS Mohammed Ali Shihab
Success Story : ‘जिद्द हवी तर अशी…’ वडिलांच्या निधनानंतर १० वर्षे अनाथाश्रलयात राहिले; आव्हानांवर मात करून UPSC सह केल्या २१ सरकारी परीक्षा उत्तीर्ण
loksatta readers feedback
लोकमानस: कोट्यवधी भारतीयांतील दुवा
Narendra Modi assertion that children from poor middle class families will fulfill their dreams of becoming doctors Mumbai print news
गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणार; नरेंद्र मोदी
Rape In Mumbai Marathi news
Mumbai Crime : मुंबईत १८ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, पाण्यातून गुंगीचं औषध दिलं आणि…
amravati teachers protest marathi news
अमरावती : “आम्हाला शिकवू द्या, शाळा बनल्या उपक्रमांच्या प्रयोगशाळा”; शिक्षकांचा उस्फूर्त मोर्चा
women prostitution, Nagpur, husband Nagpur,
देहव्यवसायाच्या दलदलीतून बाहेर पडत ती पुन्हा संसारात रमली

आणखी वाचा : Bigg Boss 17 : डोंगरीचा मुनव्वर फारुकी ठरला ‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वाचा विजेता; तर अभिषेक कुमार उपविजेता

एका वादग्रस्त स्टँड-अप अॅक्टमुळे मुनव्वर चर्चेत आला आणि हळूहळू एक स्टँड-अप कॉमेडीयन म्हणून लोकप्रिय झाला. गुजरातच्या जुनागढजवळील एका छोट्याशा गावातून आलेल्या मुनव्वरला या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. मध्यंतरी ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुनव्वरने त्याच्या पूर्वायुष्याबद्दल बरेच खुलासे केले होते.

वडिलांच्या कर्जामुळे लहान वयातच मुनव्वरवर शिक्षण सोडून काम करायची वेळ आली. मुनव्वरची आई आणि आजी समोसे उत्तम बनवायच्या अन् मुनव्वर स्वतः एक स्टॉल लावून ते समोसे विकायचा, समोसे तळताना बऱ्याचदा मुनव्वरची बोटं भाजायची, पण त्याचा हा व्यवसाय चांगला चालला. त्यानंतर मुंबईत आल्यावरही मुनव्वरने एका गिफ्ट शॉपमध्ये तसेच एका भाड्यांच्या दुकानात अगदी पडेल ते काम केलं.

‘लॉक अप’ या शोदरम्यान मुनव्वरने आपल्या आईबद्दल एक मोठा खुलासा केला होता. त्याच्या आईने आत्महत्या केली होती. याविषयी बोलताना मुनव्वर म्हणाला, “माझी आई घर चालवण्यासाठी जे जमेल ते काम करायची, परंतु आमच्या घरात तिचा मान कुणीच ठेवला नाही. माझ्या बहिणीच्या लग्नासाठीसुद्धा माझं कुटुंब माझ्या आईलाच दोष देतं. माझ्या वडिलांवरही प्रचंड कर्ज होतं. अशी बरीच कारणं होती ज्यामुळे माझ्या आईने आत्महत्येसारखा मोठा निर्णय घेतला. माझी आई खूप खंबीर होती, तिला नेमकं काय होत आहे हे मी तिला विचारू शकलो नाही याची खंत मला आजही आहे.”