‘बिग बॉस’ १७च्या महाअंतिम सोहळ्याला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. यावेळी अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा व अरुण या पाच स्पर्धकांमध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी चांगलीच चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
महाअंतिम सोहळ्याला सुरुवात होण्यापूर्वी अंकिता लोखंडेची आई व सासूबाई एकत्र माध्यमांसमोर आल्या होत्या. अभिनेत्रीचा पती विकी जैन अंतिम फेरीच्या उंबरठ्यावर असताना घराच्या बाहेर पडला. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या फॅमिली वीक टास्कमध्ये विकीने ‘बिग बॉस’ जिंकावं अशी इच्छा अंकिताच्या सासूबाई रंजना यांनी व्यक्त केली होती. परंतु, आता विकी शोमधून बाहेर पडल्यामुळे त्यांना पुन्हा एका महाअंतिम सोहळ्यापूर्वी हा प्रश्न विचारण्यात आला.
हेही वाचा : Bigg Boss 17 Grand Finale Live : बिग बॉस १७ च्या कोणत्या स्पर्धकाला पाठिंबा देताय? सुनील शेट्टी म्हणाले….
महाअंतिम सोहळ्यापूर्वी अंकिताची आई व सासूबाईंनी पापाराझींशी संवाद साधला. यावेळी रंजना यांचा “‘बिग बॉस १७’ कोण जिंकणार? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अंकिता जिंकणारच आणि ती आमच्या घरी ट्रॉफी घेऊन येणार” असं उत्तर अभिनेत्रीच्या सासूबाईंनी दिलं. अभिनेत्रीच्या सासूबाईंनी दिलेलं उत्तर ऐकून नेटकरी थक्क झाले. कारण यापूर्वी रंजना यांनी कधीच अंकिता जिंकावी असं म्हटलं नव्हतं.
हेही वाचा : “हक्काच्या घरासाठी आईने…”, प्रथमेश परबला आठवले संघर्षाचे दिवस; म्हणाला, “चाळीने मला घडवलं!”
दरम्यान, अंकिताच्या सासूबाईंचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर “आता खरी मजा येणार”, “या एवढ्या कशा बदलल्या”, “१५ दिवसांमध्ये यांच्याच बदल झाला” अशा कमेंट्स केल्या आहेत.