Bigg Boss 17 Grand Finale : ‘बिग बॉस’१७ च्या महाअंतिम सोहळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. यावेळी अंतिम फेरीतील पाच स्पर्धकांमध्ये अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, मनारा चोप्रा, अरुण यांच्यासह पंजाबच्या अभिषेक कुमारची वर्णी लागली आहे. ‘बिग बॉस’मध्ये एन्ट्री घेतल्यापासून अभिषेक कुमार चर्चेत होता. परंतु, तुम्हाला माहितीये का अभिषेकचं खरं नाव वेगळंच आहे. तसेच करिअरमध्ये त्याने आलिया भट्टच्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अभिषेकबद्दलच्या माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेऊयात…

अभिषेकचा जन्म २६ ऑगस्ट १९९५ मध्ये गोबिंदगढ या शहरात झाला. त्याने २०१८ मध्ये ‘ये प्यार नहीं तो क्या है’ या म्युझिक व्हिडीओमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर अभिषेकने २०२१ मध्ये ‘उडारियां’ मालिकेतून टेलिव्हिजनवर एन्ट्री घेतली. यामध्ये त्याने अमरीक सिंह विर्क ही भूमिका साकारली होती.

karan veer mehra second wife Nidhi Seth talks about husband sandip kumar
अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, पतीबद्दल म्हणाली, “तो खूपच…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Kon Honar Maharashtracha Kirtankar
‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; कशी आहे नोंदणी प्रक्रिया? जाणून घ्या
chaggan bhujbal
..तर धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या- छगन भुजबळ
Sanjay Raut Ajit Pawar (1)
“अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण…”, संजय राऊतांची स्तुतीसुमने; नेमकं काय म्हणाले?
Colors Marathi Bigg Boss Marathi season 5 will be re-broadcasted
Bigg Boss Marathi 5: पुन्हा एकदा तोच राडा अन् ‘भाऊचा धक्का’ पाहायला मिळणार; तारीख, वेळ जाणून घ्या…
Shilpa Shirodkar
शिल्पा शिरोडकर ‘बिग बॉस १८’मध्ये गेल्यावर महेश बाबूने पाठिंबा का दिला नाही? अभिनेत्री म्हणाली, “त्यांना गर्विष्ठ…”
Bigg Boss 18 Fame Rajat Dalal talk about chahat pandey and controversy
Video: चाहत पांडेचं नाव ऐकताच रजत दलालने जोडले हात, विनंती करत म्हणाला…

हेही वाचा : Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे ‘बिग बॉस’ जिंकणार का? सासूबाई म्हणाल्या, “ती घरी…”

अभिषेक कुमारचं खरं नाव अभिषेक पांडे असं आहे. एकदा अभिनेत्याच्या सहकलाकारांनी त्याची तुलना बॉलिवूड स्टार अक्षय कुमारशी केली. तेव्हा त्याने आपल्या नावात अभिषेक कुमार असा बदल केला. ‘उडारियां’मध्ये काम करत असनाच अभिषेक व इशा मालवीय यांची घट्ट मैत्री होऊन पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. काही काळानंतर अभिषेक-इशाचं नातं संपुष्टात आलं.

हेही वाचा : Bigg Boss 17 Grand Finale: अंकिता लोखंडे नाही तर ‘हा’ सदस्य होणार ‘बिग बॉस १७’चा विजेता! टॉप-३ कोण जाणून घ्या…

अभिषेकने करिअरमध्ये आलिया भट्ट व वरुण धवन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये लहानशी भूमिका केली होती. सिद्धार्थ शुक्लाच्या मागे त्याने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होतं.

bigg boss 17 finale what is real name of abhishek kumar
आलिया भट्टच्या चित्रपटात साकारलेली महत्त्वाची भूमिका

याशिवाय अभिषेकचे सोशल मीडियावर देखील लाखो फॉलोवर्स आहेत. आता हा पंजाबचा स्पर्धक बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार की नाही? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Story img Loader