Bigg Boss 17 Grand Finale : ‘बिग बॉस १७’च्या महाअंतिम सोहळ्याला धमाकेदार सुरुवात झाली आहे. यंदा अंतिम फेरीत मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे व अरुण या स्पर्धकांनी धडक मारली आहे. दरवर्षी ‘बिग बॉस’च्या अंतिम सोहळ्याला घरात पहिल्या दिवसापासून सहभागी झालेले सगळे स्पर्धक उपस्थित राहतात. तीन महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या यंदाच्या पर्वात एकूण २० स्पर्धक सहभागी झाले होते. परंतु, यामधील दोन स्पर्धकांनी फिनालेकडे पाठ फिरवली आहे.
‘बिग बॉस’मध्ये यंदा अभिषेक कुमार, इशा मालवीय, आएशा खान, मुनव्वर फारुकी, मनस्वी ममगई, सना खान, अरुण माशेट्टी, सनी आर्या, खानजादी, रिंकू धवन, जिग्ना वोरा, सोनिया बन्सल, नाविद सोल, अनुराग डोबाल, समर्थ जुरैल, मनारा चोप्रा या स्पर्धकांनी तसेच अंकिता लोखंडे-विकी जैन आणि नील-ऐश्वर्या या जोड्यांनी प्रवेश घेतला होता.
यापैकी दोन स्पर्धक अंतिम सोहळ्याला अनुपस्थित राहिले आहेत. सध्या नेटकरी या दोन स्पर्धकांची आवर्जून आठवण काढत आहेत. हे दोन स्पर्धक नेमके कोण आहेत? यातील पहिली स्पर्धक म्हणजे खानजादी आणि दुसरा स्पर्धक म्हणजे अनुराग डोभाल.
खानजादी व अनुराग हे दोन स्पर्धक महाअंतिम सोहळ्याला गैरहजर राहिले आहेत. अनुरागचा या शोमधील प्रवास फारसा खास नव्हता. विशेष म्हणजे त्याने मेकर्सवर अनेकदा भेदभावाचे आरोप केले होते. तसेच एलिमिनेशनमुळे तो प्रचंड नाराज होता. याशिवाय खानजादीने देखील या पर्वात उल्लेखनीय कामगिरी केली नसल्याने तिने सोहळ्याला गैरहजेरी लावल्याचं दोघांच्याही चाहत्यांकडून बोललं जातं आहे.
हेही वाचा : Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे ‘बिग बॉस’ जिंकणार का? सासूबाई म्हणाल्या, “ती घरी…”
दरम्यान, आता लवकरच प्रेक्षकांना ‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वाचा विजेता मिळणार आहे. आता अखेरच्या दिवशी कोण बाजी मारणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.