Munawar Faruqui wins Bigg Boss 17: टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ च्या १७ व्या पर्वाचा २८ जानेवारी रोजी ग्रँड फिनाले पार पडला. अखेर चार महिन्यांनी या शोचा विजेता आज घोषित करण्यात आला. पर्वातील सर्व सदस्यांना मागे टाकत मुनव्वर फारुकीने बिग बॉस १७ ची ट्रॉफी जिंकली आहे. तर अभिषेक कुमार या शोचा उपविजेता ठरला.

Live Updates

Bigg Boss Season 17 Finale : बिग बॉस १७ ग्रँड फिनाले

00:35 (IST) 29 Jan 2024
मुनव्वर फारुकी ठरला बिग बॉस १७ चा विजेता!

अभिषेक कुमार व मुनव्वर फारुकी यांच्यापैकी मुनव्वर फारुकी बिग बॉस १७ चा विजेता ठरला आहे.

https://www.instagram.com/p/C2p7I0TIGCr/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

00:09 (IST) 29 Jan 2024
बिग बॉस १७ मधून मनारा चोप्रा बाहेर

बिग बॉस १७ मधून मनारा चोप्रा बाहेर पडली आहे. मुनव्वर फारुकी व अभिषेक कुमार हे टॉप २ स्पर्धक आहेत.

23:18 (IST) 28 Jan 2024
अंकिता लोखंडे बिग बॉस १७ मधून बाहेर

अंकिता लोखंडे बिग बॉस १७ मधून बाहेर पडली आहे. ती टॉप थ्रीमधून आउट झाली आहे. मुनव्वर फारुकी, मनारा चोप्रा अन् अभिषेक कुमार टॉप ३ स्पर्धक ठरले आहेत.

23:03 (IST) 28 Jan 2024
विकी जैनचा सना, आयशा खानबरोबर ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

महाअंतिम सोहळ्यातील विकी जैनचा सना खान, आयशा खानबरोबरचा डान्स व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

22:57 (IST) 28 Jan 2024
बिग बॉसच्या विजेत्याला किती रुपये मिळणार?

बिग बॉस १७ च्या विजेत्याला ५० लाख रुपये आणि एक कार मिळणार असल्याची घोषणा सलमान खानने केली आहे.

22:31 (IST) 28 Jan 2024
मनारा चोप्राने गायलं गाणं, पाहा व्हिडीओ

बिग बॉस १७ च्या ग्रँड फिनालेत मनारा चोप्राने गायलं गाणं... पाहा व्हिडीओ

https://twitter.com/BiggBoss_Tak/status/1751650055646576736

22:06 (IST) 28 Jan 2024
बिग बॉस १७ च्या फिनालेमध्ये माधुरी दीक्षित

बिग बॉस १७ च्या फिनालेमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षितने हजेरी लावली.

21:48 (IST) 28 Jan 2024
स्पर्धकाला घराबाहेर काढण्यासाठी आर.माधवन व अजय देवगणची एंट्री

स्पर्धकाला घराबाहेर काढण्यासाठी आर.माधवन व अजय देवगण शोच्या फिनालेमध्ये आले आहेत. कोण जाणार घराबाहेर?

21:21 (IST) 28 Jan 2024
टॉप ५ स्पर्धकांसाठी स्पेशल व्हिडीओ

अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, मनारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी या पाच स्पर्धकांच्या कुटुंबियांनी त्यांच्या प्रवासाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

21:06 (IST) 28 Jan 2024
अंकिता लोखंडे टॉप ५ मधून बाहेर?

अंकिता लोखंडे टॉप ५ मधून बाहेर झाल्याचं वृत्त द खबरीने दिलंय. ती चौथ्या नंबरला घरातून बाहेर पडली, असं त्यांनी म्हटलंय. मात्र याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

https://twitter.com/TheKhabriTweets/status/1751628628272820535

21:02 (IST) 28 Jan 2024
अंकिताने सासूबाईंना दिलं वचन, म्हणाली...

अंकिता लोखंडेच्या सासूबाई रंजना जैन यांनी बिग बॉस १७ च्या ग्रँड फिनालेला हजेरी लावली. यावेळी सासू व सूनेने एकमेकांना वचन दिले.. पाहा पूर्ण व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/C2pg2EdyfO7/?utm_source=ig_web_copy_link

20:54 (IST) 28 Jan 2024
अंकिताने विकीला सर्वांसमोर केलं किस

अंकिता लोखंडेने पती विकी जैनबरोबर डान्स केला आणि त्याला सर्वांसमोर किस केलं.

20:20 (IST) 28 Jan 2024
अंकिता लोखंडे विकी जैनचा रोमँटिक डान्स

अंकिता लोखंडे विकी जैन यांनी बिग बॉस १७ च्या ग्रँड फिनालेमध्ये रोमँटिक डान्स केला.

20:15 (IST) 28 Jan 2024
‘बिग बॉस’ फेम अभिषेक कुमारचं खरं नाव माहितीये का?

तुम्हाला माहितीये का अभिषेकचं खरं नाव वेगळंच आहे. तसेच करिअरमध्ये त्याने आलिया भट्टच्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अभिषेकबद्दलच्या माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेऊयात…

पूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

20:07 (IST) 28 Jan 2024
अब्दू रोझिकची बिग बॉसच्या घरात एंट्री

बिग बॉस १६ मधील स्पर्धक अब्दू रोझिकने बिग बॉस १७ च्या फिनालेला हजेरी लावली.

20:03 (IST) 28 Jan 2024
समर्थ व अभिषेकचा स्पेशल डान्स

बिग बॉस १७ च्या ग्रँड फिनालेमध्ये अभिषेक कुमार व समर्थ जुरैलने डान्स केला.

19:47 (IST) 28 Jan 2024
विकी जैनची अंकिता लोखंडेसाठी खास पोस्ट; नेटकरी म्हणाले, “तू बरोबर होतास, तिने…”

ग्रँड फिनालेनिमित्ताने विकी जैनने अंकितासाठी खास पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे. ती वाचून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

19:42 (IST) 28 Jan 2024
बिग बॉस १७ च्या टॉप पाच स्पर्धकांपैकी 'हा' स्पर्धक घराबाहेर?

बिग बॉस १७ च्या टॉप पाच स्पर्धकांपैकी अरुण माशेट्टी घराबाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. तसं झाल्यास अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार व मनारा चोप्रा यापैकी एक जण विजेता ठरणार.

https://twitter.com/Biggboss17_live/status/1751608426227171747

19:38 (IST) 28 Jan 2024
अंकिता लोखंडे ‘बिग बॉस’ जिंकणार का? सासूबाई म्हणाल्या, “ती घरी…”

महाअंतिम सोहळ्यापूर्वी अंकिताची आई व सासूबाईंनी पापाराझींशी संवाद साधला. यावेळी रंजना यांना“‘बिग बॉस १७’ कोण जिंकणार? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी काय उत्तर दिलं ते वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

19:36 (IST) 28 Jan 2024
बिग बॉस १७च्या टॉप पाच स्पर्धकांचे लूक चर्चेत

अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, मनारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी या पाच स्पर्धकांचे लूक चर्चेत. पाहा व्हिडीओ…

https://www.instagram.com/p/C2pYGcAyVXl/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

19:25 (IST) 28 Jan 2024
बिग बॉस १७ च्या फायनलिस्टचा रॅम्पवॉक पाहिलात का?

अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, मनारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी या पाच स्पर्धकांनी रॅम्पवॉक केला. पाहा व्हिडीओ...

https://twitter.com/Biggboss17_live/status/1751603837952311448

19:21 (IST) 28 Jan 2024
बिग बॉस १७ चा विजेता कोण? होस्ट भारती सिंग उत्तर देत म्हणाली...

भारती सिंग बिग बॉस १७ च्या फिनालेत सलमान खानची को-होस्ट आहे. तिला विजेत्याचं नाव विचारण्यात आलं. त्यावर तिने काय उत्तर दिलं? पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/C2pVAe7yG-e/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

19:05 (IST) 28 Jan 2024
बिग बॉस १७ च्या घरात ओरीची एंट्री

बॉलीवूड सेलिब्रिटींचा बेस्ट फ्रेंड व सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर ओरीने बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे. तो स्पर्धकांबरोबर एक गेम खेळत आहे.

https://www.instagram.com/reel/C2pThEXS7Cm/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

18:41 (IST) 28 Jan 2024
ग्रँड फिनालेमध्ये दोन स्पर्धकांची गैरहजेरी

अनुराग डोभाल आणि खानजादी या दोन स्पर्धकांव्यतिरिक्त सर्व माजी स्पर्धक बिग बॉस सीझन १७ च्या ग्रँड फिनालेला हजेरी लावली.

18:38 (IST) 28 Jan 2024
समर्थने जेव्हा मुनव्वरची नक्कल केली

समर्थने शोमध्ये मुनव्वरची नक्कल केली आहे. पाहा व्हिडीओ

https://twitter.com/Biggboss17_live/status/1751591908311482636

Bigg Boss Season 17 Finale Live in Marathi

कोण होणार बिग बॉस १७ चा विजेता? सलमान खान करणार घोषणा

बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिअॅलिटी शो आहे. ‘बिग बॉस १७’ चा ग्रँड फिनाले आज २८ जानेवारी २०२४ रोजी पार पडतोय. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी हे पाच स्पर्धक या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले आहेत. आज या शोच्या १७ व्या पर्वाचा विजेता कोण आहे, हे कळेल.

Story img Loader