Bigg Boss 17 Update: ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा सुरू होण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत. या पर्वाचा कोण विजेता ठरणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या टॉप-५मधील अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी यांना भरभरून मतं दिली जात आहेत. इतर कलाकार मंडळी आपल्या आवडत्या सदस्यांसाठी चाहत्यांना मत देण्यासाठी आवाहन करत आहेत. २८ जानेवारी सकाळी १२ वाजेपर्यंत ही मत प्रक्रिया सुरू असणार आहे. त्यानंतर थेट रात्री १२ वाजता ‘बिग बॉस १७’चा विजेता घोषित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संध्याकाळी ६ वाजता ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा सुरू होणार असून रात्री १२ वाजेपर्यंत असणार आहे. अशातच महाअंतिम सोहळ्यातील काही व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामध्ये ऐश्वर्या शर्मा-नील भट्ट, इशा मालविया-समर्थ जुरेल यांचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Bigg Boss 17: विक्की जैनने मुलींबरोबर पार्टी केल्याचं रोहित शेट्टीने अंकिता लोखंडेला सांगितलं, अभिनेत्री म्हणाली…

‘द खबरी’ या एक्सवरील अकाउंटवर ऐश्वर्या शर्मा-नील भट्ट, इशा मालविया-समर्थ जुरेल यांचा महाअंतिम सोहळ्यातला डान्स व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये या दोन जोड्या करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. ऐश्वर्या शर्मा-नील भट्ट ‘बोल चुडिया’ या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. तर इशा मालविया-समर्थ जुरेल ‘यू आर माय सोनिया’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा – सरकार दरबारी ‘या’ मराठी अभिनेत्याचं झालं कौतुक, पोस्ट करत म्हणाला, “अविस्मरणीय दिवस…”

दरम्यान, अनेक वृत्तांनुसार, मतांच्या स्पर्धेत मुनव्वर फारुकी व अभिषेक कुमार आघाडीवर आहेत. त्यानंतर अंकिता लोखंडे व मनारा चोप्रा यांच्यात चुरस सुरू आहे. कारण दोघींच्या मतांमध्ये काही मतांचा फरक आहे. या मतांच्या शर्यतीत अरुण माशेट्टी पिछाडीवर आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 17 grand finale neil bhatt and aishwarya sharma isha malviya samarth jurel dance performance video viral pps
First published on: 27-01-2024 at 19:25 IST