Bigg Boss 17 Grand Finale: ‘बिग बॉस १७’ चे पर्व आता शेवटच्या टप्प्यावर आले असून आज या पर्वाचा शेवटचा दिवस आहे. ‘बिग बॉस’चा महाअंतिम सोहळा आज म्हणजेच २८ जानेवारी रोजी पार पडणार आहे. अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा, मुनव्वर फारूकी व अरुण माशेट्टी हे ‘टॉप पाच’ स्पर्धक ग्रॅंड फिनालेमध्ये पोहोचले आहेत.
अंतिम फेरीच्या अगोदर, निर्मात्यांनी ग्रॅंड फिनालेची झलक दाखवत प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन रोमँटिक नृत्य सादर करताना दिसत आहेत.
हेही वाचा… VIDEO: प्रियांका चोप्राच्या पतीचं भारतात जोरदार स्वागत! निक जोनासला पाहताच चाहते म्हणाले, “जीजू…”
कलर्स टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम चॅनलवर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये विकी जैन काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत आहे तर अंकिता लोखंडेने लाल रंगाची शिमर साडी परिधान केली आहे. ‘कभी खुशी कभी गम’च्या गाण्यावर नृत्य सादर करताना हे कपल आपल्याला दिसणार आहे.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन त्यांच्या सततच्या वादामुळे नेहमी चर्चेत राहिलेली जोडी आहे. या जोडप्याला समजावून सांगण्यासाठी विकी आणि अंकिताच्या आईलाही या घरी बोलावण्यात आले होते.
हेही वाचा… शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ आता पाहता येणार टीव्हीवर! कधी व कुठे? जाणून घ्या…
फिनालेआधीच विकी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आणि अंकिता टॉप ५ मध्ये गेली. बिग बॉसच्या घरून बाहेर येताच विकीने त्याच्या घरी ग्रॅंड पार्टी आयोजित केली होती. ज्यात त्याचा मित्रपरिवार तसेच माजी स्पर्धक ईशा मालवीय, सना खान, आयशा खान यांचाही सहभाग होता. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
हेही वाचा… VIDEO: …अन् भर गर्दीत चाहतीने बॉबी देओलला केलं किस, ‘अशी’ होती अभिनेत्याची प्रतिक्रिया
‘बिग बॉस १७’ च्या महाअंतिम सोहळ्याबाबत सांगायचं झाल तर आज अखेर चार महिन्यांनी ‘बिग बॉस १७’चा विजेता जाहीर होणार आहे. यासाठी चाहते उत्सुक दिसत आहेत आणि आपल्या लाडक्या स्पर्धकांना सपोर्ट करतानाही दिसत आहेत.