Bigg Boss 17 Latest News/ Bigg Boss 17 Contestants List : टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चे १७ वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मागच्या अनेक दिवसांपासून या शोची जोरदार चर्चा होती. यामध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता होती. सलमान खानच्या या शोचे रविवारी प्रिमिअर पार पडले. त्यानंतर अखेर १७ व्या पर्वातील स्पर्धकांची नावं समोर आली आहेत. यामध्ये अनेक लोकप्रिय चेहरे आपल्या एकाच घरात टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळतील.

आयरा खानच्या सासूबाईंना पाहिलंत का? आमिर खानने केलं मराठमोळ्या विहीणबाईंचं कौतुक; म्हणाला, “प्रीतमजी…”

shilpa shirodkar on namrata shirodka mahesh babu
Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकरने बहीण नम्रता व तिचा पती महेश बाबूकडून पाठिंबा न मिळण्याबद्दल सोडलं मौन; म्हणाली, “मला…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Husband Sent Letter watch promo
Bigg Boss 18: “मी नीट झोपतंही नाहीये, जेवणाची चव गेलीये…”, शिल्पा शिरोडकरने ढसाढसा रडत वाचलं नवऱ्याचं पत्र, पाहा व्हिडीओ
prince narula yuvika chaudhary lohri celebration with daughter
सोशल मीडियावरील मतभेदानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडपे प्रथमच दिसले एकत्र; लेकीसह साजरी केली लोहरी, फोटो आले समोर
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Evicted From Salman Khan Show
Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या चार दिवसाआधी झालं मिड वीक एविक्शन, ‘ही’ मराठमोळी सदस्य झाली घराबाहेर
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance Video
‘झुमका गिरा रे…’, ५९ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर Bigg Boss फेम योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स! पतीची खास कमेंट
punjab kings new captain announced in 18 big boss
‘पंजाब किंग्ज’च्या नव्या कर्णधाराचे नाव ‘बिग बॉस १८’ मध्ये झाले जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूकडे सोपवली धुरा
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

यंदा ‘बिग बॉस’च्या १७ पर्वात १७ स्पर्धक सहभागी झाले असून ते या घरात १०५ दिवसांसाठी राहतील. या पर्वात दोन जोडप्यांची देखील एंट्री झाली आहे. टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने पती विकी जैनबरोबर शोमध्ये सहभाग घेतला आहे. याशिवाय कॉमेडियन व लॉक अप शोचा विजेता मुनव्वर फारुकीदेखील या पर्वात दिसणार आहे. इतकंच नाही तर ब्रेकअप झालेले दोन कलाकारदेखील शोमध्ये सहभागी झाले असून ग्रँड प्रिमिअरमध्येच त्यांचं भांडण झालं, जे सोडवायला सलमान खानला मध्यस्थी करावी लागली.

‘बिग बॉस १७’मधील स्पर्धकांची यादी

मन्नारा चोप्रा, मुनव्वर फारुकी, ऐश्वर्या शर्मा, नील भट, नवीद सोल, अनुराग डोभाल/बाबू भैया (मोटोव्लॉगर), सना रईस खान (वकील), जिग्ना व्होरा (एक्स क्राइम रिपोर्टर), अंकिता लोखंडे, विकी जैन, सोनिया बन्सल, खानजादी (फिरोजा खान), सनी आर्या (तहलका भाई), रिंकू धवन, अरुण माशेट्टी, अभिषेक कुमार आणि ईशा मालवीय हे ‘बिग बॉस १७’ मधील स्पर्धक आहेत.

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या या पर्वात अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळतील. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी यंदा बरेच ट्विस्ट ठेवण्यात आले आहे. घर तीन विभागांमध्ये विभागले गेले आहे आणि ते ‘दिल, दिमाग आणि दम’ थीमवर आधारित आहे. हा शो प्रेक्षकांना कलर्स टीव्हीवर पाहता येईल. तसेच जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटवर इथेही शोचे स्ट्रीमिंग केले जाईल.

Story img Loader