Gunratna Sadavarte: Bigg Boss 18 मधून वकील गुणरत्न सदावर्ते बाहेर पडले आहेत. त्यांना कोर्टातील एका केससंदर्भातील सुनावणीसाठी घरातून बाहेर निघावं लागलं. मराठा आरक्षणाबद्दल त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली होती. त्याच्या सुनावणीसाठी त्यांना बाहेर पडावं लागलं. बिग बॉसमध्ये १० दिवस राहून घराबाहेर आल्यावर सदावर्तेंनी होस्ट सलमान खानला अंडरवर्ल्डपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत गुणरत्न सदावर्तेंनी या रिॲलिटी शोबद्दल सांगितलं. त्यांना प्रेक्षकांना काय सांगायचं आहे? असं विचारण्यावर ते म्हणाले, “मला हेच म्हणायचं आहे की फिल्म इंडस्ट्रीने अंडरवर्ल्डपासून दूर राहावे. गोष्टी चांगल्या राहाव्या यासाठी कलाकारांनी इतर कलाकारांबरोबर संबंध चांगले ठेवावे. किरकोळ गोष्टींवर वाद झाल्यावर चुकीच्या गोष्टींमध्ये वाहून जाऊ नये. याचेच परिणाम कलाविश्वाला भोगावे लागले आहेत. त्यामुळे कलाकारांनी अंडरवर्ल्डपासून दूर राहिलेलं चांगलं. प्रॉब्लेम शाहरुखचा असो, सलमानचा असो, गोविंदाचा असो, तो प्रॉब्लेमच असतो, असं मला वाटतं. त्यामुळे चुकीच्या गोष्टींमध्ये पडू नये आणि कलाकारांनी एकमेकांबद्दल राग ठेवू नये.”
हेही वाचा – Bigg Boss 18: बिग बॉसमधून बाहेर पडलेल्या गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या आदराने…”
बिग बॉस १८ मधील टॉप ५ सदस्य कोण असतील, असं वाटतंय असा प्रश्न विचारण्यात आल्यावर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “शोमध्ये सगळेच कलाकार एकसारखे आहेत. १७ कलाकारांमध्ये सर्वात वर गुणरत्न आहे. हे मी म्हणत नाही, जनता म्हणते.”
हेही वाचा – Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्तेंची अचानक शोमधून एक्झिट! नेमकं काय घडलं? ते बिग बॉसच्या घरात परतणार का? वाचा
सलमान खानला मिळणाऱ्या धमक्यांबद्दल काय म्हणाले सदावर्ते?
सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांबद्दल सदावर्तेंना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, धर्माच्या बाबतीत काही गोष्टी असतील तर त्या सलमानने धर्मगुरूच्या सल्ल्यानेच सोडवायला हव्या. तसेच वकील असल्याने सलमानला जर कधी गरज भासली तर मी मदत करेन, असंही सदावर्ते टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.