टेलिव्हिजवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस १७’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. दिवसेंदिवस हा शो मनोरंजक होताना दिसत आहे. ‘बिग बॉस १७’ च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये ईशा मालवीय आणि अभिषेक कुमारमध्ये जोरदार भांडण झालेले बघायला मिळाले. ईशा मालवीय व तिचा बॉयफ्रेंड समर्थ जुरेलने आभिषेकच्या मानसिक आरोग्याची चेष्ठा केली.
नुकतेच, बिग बॉस च्या घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला, यादरम्यान अभिषेक कुमार व समर्थ जुरैल यांच्यात जोरदार भांडण झाले. या लढतीदरम्यान अभिषेकने अनवधानाने समर्थला चापट मारली, त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले. समर्थ व अभिषेकच्या भांडणादरम्यान ईशा मालवीयने अभिषेकला धक्काबुक्की केली. या घटनेनंतर अभिषेक व ईशामध्ये नवा वाद सुरु झाला. भांडणादरम्यान अभिषेक ईशाला तिच्या चारित्र्यावरुन काही गोष्टी ऐकवल्या होत्या. या घटनेनंतर ईशाची आई अभिषेकवर चांगलीच संतापली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी अभिषेकवरचा संताप व्यक्त केला आहे.
ईशाच्या आईने पोस्टमध्ये लिहिले “या मुलाने (अभिषेकने) प्रत्येक वेळी ईशाच्या चारित्र्यावर बोट ठेवले आहे. त्याला माहिती होतं की बिग बॉसमध्ये ईशा येणार आहे तर तो या शोमध्ये का आला? त्याच्या अशा वागणूकीविरोधात कायदेशीर कारवाई करायला हवी. आताही मी फक्त ईशासाठीच गप्प आहोत. प्रत्येक वेळी ईशाला मध्ये आणलं जात याची लाज वाटली पाहिजे. या आक्रमक स्वभावाचे समर्थन करणाऱ्यांनाही लाज वाटली पाहिजे.”
यापूर्वी जेव्हा अभिषेक आणि ईशामध्ये भांडण झाले होते, तेव्हा अभिषेकने ईशाबाबत अनेक खुलासे केले होते. या प्रकारामुळे ईशाच्या वडिलांनी तिला बिग बॉसमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला असल्याची चर्चा सुरु होती. अशा प्रकारच्या भांडणांमुळे ईशाच्या व्यक्तीमत्वावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती तिच्या वडिलांनी व्यक्त केली होती. आता या प्रकरणानंतर सलमान खान काय निर्णय घेणार, सलमान कोणाला पाठिंबा देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले लागले आहे.