‘बिग बॉस’च्या १७ व्या सीझनला १६ ऑक्टोबरपासून सुरूवात झालेली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सलमान खान ‘बिग बॉस’चं पर्व होस्ट करत आहे. भाईजान दर आठवड्यात ‘वीकेंड का वार’ या कार्यक्रमात घरातील सगळ्या सदस्यांची शाळा घेतो. गेल्या आठवड्यात ‘टायगर ३’ च्या प्रमोशननिमित्ताने ‘बिग बॉस’च्या मंचावर सलमानसह कतरिना कैफ देखील उपस्थित होती. यावेळी कतरिनाने भर कार्यक्रमात सलमानचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बिग बॉसच्या ‘वीकेंड का वार’ या कार्यक्रमात सलमान खान घरातील सदस्य फिरोजा खान म्हणजेच खानजादीवर प्रचंड संतापला होता. सलमान खानजादीला म्हणतो, “तुला या घरात फक्त भांडण करण्यासाठी पाठवलं आहे का?” यानंतर सलमानचं ऐकून न घेता खानजादी त्याला स्पष्टीकरण देण्यास सुरूवात करते. तसेच मनारा चोप्रा कशी चुकीची आहे हे सगळ्यांसमोर अधोरेखित करत असते.
खानजादी शेवटपर्यंत ऐकत नसल्याचं पाहून भाईजान तिच्यावर प्रचंड भडकल्याचं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. सलमान तिला सांगतो, “तुला काहीच कळत नाहीये का? घरात कोणीही स्वत:च्या मर्यादा सोडून वागू नका. दिवाळी आहे…कतरिना तुम्हाला भेटायला आली आहे पण, तू ऐकत नाहीस.” भाईजानचा वाढता राग पाहून कतरिना त्याला हाताने मागे खेचून सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : पाकिस्तानात राहून २०,००० भारतीय सैनिकांचे प्राण वाचवणाऱ्या खऱ्याखुऱ्या ‘टायगर’ची कहाणी ठाऊक आहे का?
दरम्यान, कतरिना कैफ आणि सलमान खान यांच्या बहुप्रतिक्षित ‘टायगर ३’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई करत तब्बल ४२ कोटी कमावले आहेत. या सगळ्या चित्रपटांमध्ये सलमान खान टायगर, तर कतरिना झोयाची भूमिका साकारते.