‘बिग बॉस’चं १७वं पर्व काही दिवसांपूर्वी संपलं. २८ जानेवारी या पर्वाचा महाअंतिम सोहळा तब्बल सहा तास पार पडला अन् रात्री १२.३०च्या सुमारास विजेचा घोषित झाला. सलमान खानने मुनव्वर फारुकीला ‘बिग बॉस १७’चा विजेता म्हणून घोषित केलं. तर अभिषेक कुमार हा उपविजेता ठरला. महाअंतिम सोहळा झाल्यापासून या पर्वातील टॉप पाच स्पर्धेत सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. कुटुंबीयांबरोबर, मित्र-मैत्रीणींबरोबर ‘बिग बॉस’चे स्पर्धेक पार्टी करताना दिसत आहेत. अशातच मनाराने परिणीती चोप्राने या काळात कोणताही पाठिंबा दिला नाही, याविषयी भाष्य केलं आहे.
‘बिग बॉस १७’ सुरू असताना मनारा चोप्राचे चाहते ज्याप्रमाणे तिला पाठिंबा देत होते. त्याप्रमाणे तिच्या कुटुंबातील सदस्य देखील पाठिंबा देताना दिसले. बहीण प्रियांका चोप्रा, तिची आई मधु चोप्रा, बहीण मिताली हांडा, मिरा चोप्रा असे अनेक जण तिला पाठिंबा देताना पाहायला मिळाले. या सर्वांनी सोशल मीडियावर मनारासाठी पोस्ट देखील शेअर केली होती. पण यादरम्यान परिणीती चोप्राने मनाराविषयी एक शब्द काढला नाही किंवा सोशल मीडियाद्वारे पाठिंबाही दर्शवला नाही. त्यामुळे दोघींमध्ये वाद असल्याचं बोललं जाऊ लागलं. आता यावरच मनारा स्पष्टच बोलली आहे.
हेही वाचा – Video: अंकिता लोखंडेचा नावेदसह डान्स, ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “विकीने असं केलं असतं तर…”
‘टेली मसाला’ या एंटरटेनमेंट चॅनलशी बोलताना मनारा परिणीतीबाबत बोलली. तिला विचारलं गेलं की, तुला परिणीतीने कोणताही पाठिंबा दिला नाही. तर तुझ्याशी काही जुने वाद आहेत का? यावर मनारा म्हणाली, “माझे कोणाशीही जुने वाद नाहीत. मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करते. परिणीतीचा मला कालच भलामोठा मेसेज आला होता. तिने माझं कौतुक आणि अभिनंदन केलं. नुकतीच तिने एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे, त्यासाठी माझ्याकडून तिला खूप साऱ्या शुभेच्छा.”
हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मोठा ट्विस्ट, लवकरच सागरच्या मोठ्या मुलाची होणार एन्ट्री अन् मग…
दरम्यान, मनारा ‘बिग बॉस १७’ची सेकंड रनरअप झाली. सुरुवातीपासून शोमध्ये ती खूप चांगली खेळत होती. त्यामुळे तिची खेळण्याची पद्धत प्रेक्षकांना खूप आवडली. आता ‘बिग बॉस’मुळे मनाराचा चाहता वर्ग खूप मोठा झाला आहे.