सध्या ‘बिग बॉस १७’च्या निकालाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. विजेता मुनव्वर फारुकीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. काल, मुनव्वरचं डोंगरीत मोठ्या जल्लोषात स्वागत झालं. यावेळी चाहत्यांची तुफान गर्दी झाली होती. याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच मुनव्वरच्या एक व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओत मुनव्वर त्याच्या आयुष्यातल्या एका व्यक्तीबरोबर सेलिब्रेशन करताना दिसत आहे.
मुनव्वर फारुकीचा हा व्हायरल व्हिडीओ ‘गॉसिप कॉर्नर’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये मुनव्वर ‘बिग बॉस १७’ जिंकल्यानंतर लेकाबरोबर वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. मुनव्वर व त्याच्या लेकाच्या मागे ‘बिग बॉस १७’ची ट्रॉफी दिसत आहे.
हेही वाचा – होणाऱ्या नवऱ्याच्या आठवणीत पूजा सावंतची खास पोस्ट, सिद्धेश म्हणाला, “तुला भेटण्याची…”
दरम्यान, ‘बिग बॉस १७’च्या विजेतेपदाच्या शर्यतीत अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी हे पाच सदस्य होते. यामधून सुरुवातीला या शर्यतीतून अरुण माशेट्टी व अंकिता लोखंडे बाहेर झाली. त्यानंतर मुनव्वर, अभिषेक, मनारा या तिघांमध्ये चुरस होती. यातून मुनव्वरने बाजी मारुन ‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीवर कोरलं.
मुनव्वरला ‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीसह ५० लाखांचा चेक मिळाला. तसेच एक Hyundai Creta गाडी दिली गेली. मुनव्वरने सुरुवातीपासून दिल, दिमाग आणि दम लावला होता. त्यामुळे तो या पर्वाचा विजेता होऊ शकला. याआधी त्याने कंगना रणौतचा रिअॅलिटी शो ‘लॉकअप’ जिंकला होता.