Bigg Boss 17 Update: वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’चं १७वं पर्व आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. या पर्वाचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. पत्रकार परिषदेने हा शेवटचा आठवडा जोरदार सुरू झाला असून सदस्य धारदार प्रश्नांची उत्तर देताना दिसत आहेत. पत्रकार परिषदेतील मुनव्वर फारुकीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये मुनव्वर बिग बॉसने माझी दोन घरं उद्ध्वस्त केली, असं वक्तव्य करताना दिसत आहे.

‘कलर्स टीव्ही’ या इन्स्टाग्राम पेजवर पत्रकार परिषदेतील हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक पत्रकार मुनव्वरला विचारते की, मुनव्वर ज्याप्रकारे तुझे रिलेशनशिप समोर आले आहेत. तर असं वाटतं नाही का, बिग बॉससाठी मुन्ना बदनाम झाला? यावर मुन्नवर म्हणाला, “बिग बॉसने यावेळेस शोमध्ये तीन घरं बनवली आहेत आणि माझी दोन घरं उद्ध्वस्त केली आहेत.” त्यानंतर दुसरी पत्रकार मुन्नवरला म्हणते की, तू याही शोमध्ये मुलींचा वापर करूनच पुढे आला आहेस. आता यावर मुन्नवर काय उत्तर देतो? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

हेही वाचा – सिद्धी आणि शिवाचं कमबॅक, ‘जीव झाला वेडापिसा’ मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस

हेही वाचा – Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’ची ट्रॉफी जिंकण्यासाठी अंकिता लोखंडेची मराठीतून चाहत्यांना साद, म्हणाली, “तुमची मला साथ…”

दरम्यान, ‘बिग बॉस’मध्ये सध्या मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी, अंकिता लोखंडे, विक्की जैन राहिले आहेत. काल, २१ जानेवारीला इशा मालविया घराबाहेर झाली. आता उर्वरित सहा सदस्यांमधून कोण ‘बिग बॉस १७’ची ट्रॉफी जिंकतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.