‘बिग बॉस १७’चे पर्व आता एका रंजक वळवणावर येऊन पोहोचले आहे. २८ जानेवारीला ‘बिग बॉस’चा ग्रॅण्ड फिनाले पार पडणार आहे. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारूकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा व अरुण माशेट्टी हे ‘टॉप पाच’ स्पर्धक आहेत. कोण होणार बिग बॉस १७ चा विजेता/विजेती याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फिनालेआधी अनेक बॉलीवूड आणि टीव्ही स्टार्स या शोमध्ये येऊन स्पर्धकांसह गप्पा मारताना दिसले आहेत. बिग बॉसच्या आगामी भागात चित्रपट निर्माता व ‘खतरों के खिलाडी’चा होस्ट रोहित शेट्टी येणार आहे. या शोच्या प्रोमोमध्ये रोहित स्पर्धकांची ‘शाळा’ घेताना दिसत आहे; तर काही स्पर्धकांना त्यांच्या वर्तनाबद्दल खडे बोल सुनावताना दिसत आहे.

हेही वाचा… अभिनेते इरफान खान यांचा जीवनप्रवास सांगणाऱ्या कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन; त्यांच्या पत्नी म्हणाल्या, “त्यानं केलेलं काम…”

खरं तर रोहित या शोमध्ये फक्त स्पर्धकांना भेटायलाच आला नाही, तो या सीझनमध्ये त्याला आवडलेल्या स्पर्धकाला ‘खतरों के खिलाडी’साठी ऑफर देणार आहे. आधीच्या पर्वातही रोहित शेट्टीने बिग बॉसच्या घरात जाऊन एका स्पर्धकाची निवड केली होती. आता या सीझनमध्येही रोहित त्याच्या शोसाठी त्याला योग्य वाटणाऱ्या स्पर्धकाला ऑफर देणार आहे.

हेही वाचा… ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींचं शिक्षण आहे खूपच कमी, एकीने तर फक्त सहावीतच सोडलेली शाळा

‘द खबरी’च्या माहितीनुसार रोहित शेट्टीने बिग बॉसच्या शोमध्ये येऊन पाचही स्पर्धकांशी गप्पा मारल्या. त्यांना काही स्टंट्सही करायला लावले; ज्यानंतर रोहितने अभिषेकला ‘खतरों के खिलाडी’साठी ऑफर दिली. दरम्यान, अभिषेकनं या शोसाठी इच्छुक असल्याचं म्हटलंय; पण तो ही ऑफर स्वीकारतो की नाही, हे तो बिग बॉसमधून बाहेर पडल्यावरच कळेल.

अभिषेकचे चाहते रोहित शेट्टीने दिलेल्या या ऑफरबद्दल कमेंट सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. “आधी ‘बिग बॉस’ आणि मग ‘खतरों के खिलाडी’ असे दोन्ही शो जिंकून ये,” अशी कमेंट ‘द खबरी’च्या पोस्टवर एका नेटकऱ्याने केली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 17 rohit shetty offer abhishek kumar for khatron ke khiladi dvr