‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो म्हणून ओळखला जातो. १५ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस’च्या नव्या १७ व्या पर्वाला सुरूवात होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाचा नवीन प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला. सध्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस’च्या नव्या घराचा आणि तेथे करण्यात आलेल्या सजावटीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “‘तू है मेरी किरण’ गाण्याचा अर्थ अतिशय चुकीचा”, ‘जवान’ फेम अभिनेत्याने मांडलं मत, म्हणाला, “मुलीला जबरदस्ती किस…”

Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Public Works Minister Shivendra Raje, Satara Shivendra Raje,
साताऱ्यातील आम्ही चारही मंत्री एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास करू, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचा विश्वास
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”

‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वाची थीम इतर सीझनपेक्षा काहीशी वेगळी असणार आहे. या थीमचं नाव ‘दिल, दिमाग और दोस्ती’ असं ठेवण्यात आलं आहे. बिग बॉसच्या घरात यंदा अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा विकी जैन प्रवेश करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. आता नुकताच १७ व्या पर्वाच्या आलिशान घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये यंदाच्या ‘कपल आणि सिंगल’ या थीमप्रमाणे सजावट सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : हस्तमैथुनसारख्या विषयामुळे सेन्सॉरच्या कात्रीत सापडलेला ‘OMG 2’ आता ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहता येणार?

‘बिग बॉस’चं १७ वं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने सध्या संपूर्ण घराच्या सजावटीचं काम अंतिम टप्प्यात सुरु असल्याचं या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे, ईशा मालवीय, अर्जित तनेजा, ऐश्वर्या शर्मा आणि अरमान मलिका हे कलाकार १७ व्या पर्वात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : Video: अखेर क्रांती आणि समीर वानखेडेंच्या जुळ्या मुलींची पहिली झलक समोर; अभिनेत्रीने शेअर केला गोड व्हिडीओ

दरम्यान, ‘बिग बॉस सीझन १७’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना १५ ऑक्टोबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता पाहता येईल. तर नेहमीप्रमाणे शनिवारी आणि रविवारी ‘बिग बॉस’ रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म ‘जिओ सिनेमा’वर प्रेक्षकांना २४ तास ‘बिग बॉस’च्या घरातील लाइव्ह घडामोडी पाहायला मिळणार आहे.

Story img Loader