‘बिग बॉस १७’ आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या २८ जानेवारीला ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वाचा ग्रॅण्ड फिनाले पार पडणार आहे. या फिनालेमध्ये अंकिता लोखंडे, मुनव्वर फारूकी, मनारा चोप्रा, अभिषेक कुमार व अरुण माशेट्टी यांच्यात स्पर्धा बघायला मिळणार आहे. मात्र, अंतिम फेरीपूर्वी विकी जैनच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नॉमिनेशन टास्कदरम्यान विकी ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडला. गेल्याच आठवड्यात समर्थ जुरैलही या शोमधून बाहेर झाला होता. समर्थ वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून शोमध्ये आला होता. दरम्यान, एका कार्यक्रमात समर्थने विकी व अंकिताबाबत अनेक खुलासे केले आहेत.

नुकताच समर्थ जुरैल कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. या कार्यक्रमादरम्यान समर्थने विकी जैनबाबत अनेक खुलासे केले आहेत. समर्थने विकी बिग बॉसच्या घरात कसा राहायचा याबाबत सांगितले. समर्थ म्हणाला, “बिग बॉसच्या घरात विकी तीन ते चार दिवस अंघोळ करायचाच नाही. एकदा त्याने आंघोळच न करण्याचा आणि तीन दिवस तेच कपडे घालण्याचा विक्रम केला होता. विकी अतिशय अस्वच्छ व्यक्ती आहे.”

अंकिताबाबत बोलताना समर्थ म्हणाला “बिग बॉसच्या घरात सगळ्यांचे मिळून जितके कपडे आहेत तितके कपडे फक्त अंकिताकडे आहेत. एकदा ईशाने अंकिता स्वच्छता राखत नसल्याची तक्रारही केली होती. अंकिता ‘बिग बॉस’च्या घरात येण्यापूर्वी २०० कपडे घेऊन आली होती. मात्र, त्यानंतरही ती बाहेरून आणखी कपडे मागवत होती.”

हेही वाचा- शोसाठी अंकिता लोखंडे एक्स बॉयफ्रेंड सुशांतचं नाव वापरते? उत्तर देत म्हणाली, “मी जिथे आहे, तिथे त्याच्याबद्दल…”

‘बिग बॉस’चे यंदाचे पर्व हे खेळापेक्षा वादांमुळेच जास्त गाजले. ‘बिग बॉस’च्या प्रत्येक भागामध्ये प्रेक्षकांना नवनवीन ट्विस्ट बघायला मिळाले. शोच्या सुरुवातीपासून अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन यांच्यामध्ये वाद होताना बघण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांमध्ये दोघांचे वाद टोकाला गेल्याचे दिसून आले आहे. बिग बॉसच्या घरात अनेकदा दोघांनी वेगळे होण्याबाबत वक्तव्य केले आहे.