‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाची महाअंतिम फेरी जसजशी जवळ येते आहे, तसतशी सदस्यांमधील स्पर्धा वाढत आहे. प्रत्येक सदस्य महाअंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टास्कमध्ये १०० टक्के देत आहे. त्यामुळे सगळ्या सदस्यांमध्ये चांगली चुरस पाहायला मिळत आहे. असं असलं तरी दुसऱ्याबाजूला अंकिता लोखंडे व विक्की जैनमधले वाद काही कमी होण्याचं नाव घेतं नाहीये.

अलीकडे फॅमिली वीक झाला. यावेळी अंकिता व विक्कीची आई त्यांना भेटायला आली होती. यादरम्यान विक्कीच्या आईने अंकितावर अनेक आरोप करत तिला फटकारलं. तसंच एका मुलाखतीमध्ये अंकिताची सासू म्हणाली की, अंकिता सहानुभूती मिळवण्यासाठी सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलते. अंकिताला तिच्या सासू आणि नवऱ्याकडून मिळत असलेली ही वागणूक पाहून तिचे चाहते तिचं जोरदार समर्थन करत आहे. एवढंच काय अनेक कलाकार मंडळी अंकिताचं समर्थन करत आहेत. अशातच आता अंकिताच्या समर्थनात सुशांतची बहीण देखील उतरली आहे.

shilpa shirodkar on namrata shirodka mahesh babu
Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकरने बहीण नम्रता व तिचा पती महेश बाबूकडून पाठिंबा न मिळण्याबद्दल सोडलं मौन; म्हणाली, “मला…”
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Husband Sent Letter watch promo
Bigg Boss 18: “मी नीट झोपतंही नाहीये, जेवणाची चव गेलीये…”, शिल्पा शिरोडकरने ढसाढसा रडत वाचलं नवऱ्याचं पत्र, पाहा व्हिडीओ
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Evicted From Salman Khan Show
Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या चार दिवसाआधी झालं मिड वीक एविक्शन, ‘ही’ मराठमोळी सदस्य झाली घराबाहेर
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

हेही वाचा – अंगात ताप असूनही ‘ठरलं तर मग’मधील अभिनेत्री करतेय काम, इन्स्टा स्टोरी शेअर करत म्हणाली…

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेताने सिंह किर्तीने इन्स्टाग्रामवर अंकिता लोखंडेच्या समर्थनात एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने अंकिताच्या आईच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यावर श्वेताने लिहिल आहे, “अंकी आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू खूप चांगली आहेस आणि खरी आहेस.”

श्वेताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अंकिताची आई म्हणते की, जेव्हा ते रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा ती सुशांतवर खरंच खूप प्रेम करत होती. तो मुलगाच तसा होता. त्याची बहीण, वडील अजूनही अंकिताशी बोलतात. बिग बॉसमध्ये ती कधी स्वतःहून सुशांतविषयी बोलली नाही. तिला समोरून विचारलं जातं तेव्हाच ती बोलते.

हेही वाचा – विमानाला १० तास उशीर झाल्याने अभिनेता रणवीर शौरीचा संताप, म्हणाला, “कंपनी विरोधात…”

दरम्यान, अंकिता लोखंडे व सुशांत सिंह राजपूत सात वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. अचानक दोघांचा ब्रेकअप झाला. तरी सुशांतच्या अंतिम संस्कारमध्ये अभिनेत्री कुटुंबीयांबरोबर हजर राहिली होती.

Story img Loader