Bigg Boss 17 Update: ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. २८ जानेवारीला तब्बल ६ तास हा सोहळा होणार असून रात्री १२ वाजता ‘बिग बॉस १७’चा विजेता घोषित होणार आहे. त्यामुळे मत प्रक्रिया जोरदार सुरू आहेत. चाहते आपापल्या टॉप-५मधील सदस्यांना मत करत आहेत. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी या टॉप-५मधून ‘बिग बॉस १७’चा विजेता ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बिग बॉस’मधून बाहेर झालेला विक्की जैन सध्या पत्नीला मत देण्यासाठी चाहत्यांना आवाहन करताना दिसत आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना अंकिताला भरभरून मत देण्यासाठी आवाहन केलं आहे. या व्हिडीओत विक्की म्हणतोय, “हाय, तुमच्या सर्वांचा विक्की भैया, तुमच्यासमोर पुन्हा एकदा. शो आता अशा टप्प्यावर पोहोचला आहे, जिथे अंकिला तुमच्या प्रेमाची खूप जास्त गरज आहे. शोमध्ये इथंपर्यंत ती तुमच्या प्रेमामुळेचं पोहोचली आहे. तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिलं, त्यासाठी खूप धन्यवाद. आता तुम्हाला मी एक विनंती करतो, आता तुम्ही मतांच्या माध्यमातून अंकिताला जितकं प्रेम देऊ शकता, तितकं द्या. मला खूप आनंद होईल. धन्यवाद.”

हेही वाचा – Video: प्रजासत्ताक दिनी केतकी चितळेला जात विचारायला आली महानगरपालिकेची महिला, अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

हा व्हिडीओ शेअर करत विक्कीने लिहिलं आहे, “पहिल्या दिवसापासून अंकिताने फक्त मनोरंजनचं केलं नाही तर आपली नाती देखील चांगली जपली. जितकं प्रेम तुम्ही तुमच्या विक्की भैयाला दिलं, आता तितकंच विक्कीच्या मंकुला पण द्या. माझ्या बायकोला मत द्या. रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत मत देऊ शकता, जिओ सिनेमा अॅपवर.”

हेही वाचा – “एका शोचे किती पैसे घेता?” चाहत्याच्या प्रश्नावर राहुल देशपांडे उत्तर देत म्हणाले…

दरम्यान, अनेक सेलिब्रिटी देखील अंकिता लोखंडेच्या समर्थनार्थ उतरले आहेत. आपापल्या चाहत्यांना हे सेलिब्रिटी सोशल मीडियाद्वारे अंकिताला मत देण्यासाठी आवाहन करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 17 update vicky jain appeal vote for wife ankita lokhande video viral pps
Show comments