Bigg Boss 17 Update: ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा २८ जानेवारीला रंगणार आहे. अवघे तीन दिवस महाअंतिम सोहळ्याला बाकी आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या प्रेक्षकांमध्येही उत्सुकता पाहायला मिळत आहे. यंदाच्या पर्वाचा विजेता कोण होणार? याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर विक्की जैनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने पत्नी अंकिता लोखंडेबद्दल भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काही दिवसांपूर्वीच विक्की जैन ‘बिग बॉस १७’मधून बाहेर पडला. तेव्हापासून विक्की अजूनच चांगला चर्चेत आला आहे. नुकतीच त्याने ‘बिग बॉस’मधल्या गर्ल गँगबरोबर पार्टी केली. ज्यामध्ये सना खान, आयशा खान, इशा मालविया होत्या. याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. अशातच विक्कीचा एक व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 17 मध्ये अंकिता लोखंडेच्या पतीने प्रसिद्धी अन् पैसा दोन्ही कमावलं, विकी जैनला शोसाठी मिळालं ‘इतकं’ मानधन

या व्हिडीओत विक्की म्हणतो की, अंकिता जिंकून ट्रॉफी घरी घेऊन येऊ दे, एवढीच सगळ्यांची इच्छा आहे. ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर मला तिची खूप आठवण येत आहे. तिची खूप सवय झालीये. एवढं लग्नाअगोदरही आम्ही दूर राहिलो नव्हतो. त्यामुळे आता असं वाटतंय, ती लवकर बाहेर यावी.”

पुढे विक्की म्हणतो, “अंकिताला टक्कर मुन्नवर, अभिषेक नक्की देतील. शिवाय मन्नारा देखील छान खेळतेय. पण यात मला काही समस्या नाही. मात्र अंकिता जिंकावी, असं मला वाटतं. संपूर्ण पाठिंबा अंकिताला दे देवा.”

हेही वाचा – Animal OTT Release: रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ आता ओटीटीवर; कधी, कुठे पाहता येणार? वाचा

दरम्यान, अंकिता लोखंडेसह मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी टॉप-५मध्ये आहेत. यामधून आता कोण बाजी मारून ‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीवर नाव कोरतंय? हे पाहणं उत्कंठावर्धक असणार आहे.