‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. महाअंतिम फेरीला अवघे काही आठवडे बाकी आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस १७’ जिंकण्यासाठी सदस्यांमधील स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला. यावेळी अंकिता लोखंडे, विक्की जैन, आयशा खान व इशा मालविया या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिटेड झाले. तर मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण श्रीकांत माशेट्टी हे चार जण थेट फिनाले वीकमध्ये पोहोचले. त्यामुळे सध्या बिग बॉसच्या घरात दोन गट पडले असून दोघांमध्ये वाद सुरू झाले आहेत. अशातच दुसऱ्याबाजूला सोशल मीडियावर विक्की जैन व आयशा खानचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

‘बिग बॉस व्हायरल’ या इन्स्टाग्राम पेजवर विक्की कौशल व आयशा खानचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये विक्की व आयशा एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे. दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अंकिता लोखंडेसह विक्की व आयशाला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा – Bigg Boss 17: फिनाले वीकमध्ये पोहोचले मुनव्वर फारुकीसह ‘हे’ चार सदस्य, अंकिता लोखंडे होणार शर्यतीतून बाहेर?

एका नेटकऱ्याने व्हिडीओवर प्रतिक्रिया देत लिहिल आहे, “कुठे गेली अंकिता काकू, जिला मन्नारा आणि विक्कीच्या मैत्रीची समस्या होती. आता तिला हे दिसणार नाही. पण मन्नारा विक्कीला भैया बोलवते याची तिला समस्या आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिल आहे, “अंकिताला मन्नाराशी समस्या आहेत. पण हे पाहून आयशाशी समस्या नाही. अंकिता पागल आहे. डोकं नसलेली आहे.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिल आहे, “अंकिता हे तुझं भविष्य आहे.”

दरम्यान, ‘बिग बॉस’चं हे पर्व महाअंतिम फेरीपर्यंत येऊन पोहोचत आहे. पण तरीही अंकिता व विक्कीची भांडणं थांबायचं काही नावचं घेतं नाहीये. नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयावरून अंकिता व विक्कीमध्ये भांडणं होतं आहेत.

Story img Loader