‘बिग बॉस १७’ हा शो शेवटच्या टप्प्यात आहे. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी हे टॉप पाच स्पर्धक आहेत. २८ जानेवारीला बिग बॉस १७ चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. अंकिताचा पती विकी जैन हा टॉप पाचच्या यादीत येण्याआधीच बिग बॉसच्या घराबाहेर पडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉसच्या या सिझनमध्ये विकी जैन हा कोणत्या ना कोणत्या वादात सापडताना दिसला. व्यवसायाने उद्योजक असलेला विकी बिग बॉसच्या घरात आपली वेगळी ओळख तयार करण्यासाठी आला होता. यात त्याला यशही आलं, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अंकिताचा पती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विकीने सगळ्यांना तितकीच टक्कर देत बिग बॉसमध्ये आपलं स्थान टिकवून ठेवलं. मुनव्वर फारुकीबरोबरच्या भांडणापासून ते अंकितासह घटस्फोटाच्या वादांमुळेही विकी शोमध्ये चर्चेत राहिला.

हेही वाचा… Bigg boss 17 मधून बाहेर येताच विकी जैनची गर्ल गँगबरोबर पार्टी; अंकिता लोखंडे म्हणाली, “मी नसताना घरी कोण कोण आलं, ते…”

बिग बॉस १७ मुळे विकीला प्रसिद्धी तर मिळालीच, परंतु पैसाही मिळाला. ‘सियासत डॉट कॉम’च्या रिपोर्टनुसार, विकी जैनला एका एपिसोडसाठी ७१,००० रुपये मानधन मिळत होतं. या हिशोबाने आठवड्याला विकी पाच लाख रुपये कमवत होता. विकी बिग बॉस १७ च्या पर्वात शेवटच्या आठवड्यापर्यंत होता. जर याचा हिशोब केला तर त्याने या सीझनमधून ७० लाख रुपये कमावले आहेत.

(credit- realvikasjainn / Instagram)

नेहमी चर्चेत राहणारा विकी सोशल मीडियावरही तितकाच प्रसिद्ध झाला. शोमधल्या भांडणामुळे असो किंवा इतर टास्कमुळे त्यालाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला. सध्या विकी बिग बॉसच्या घराबाहेर पडला आहे. तो फिनालेमध्ये पोहोचू शकला नाही, पण आता त्याची पत्नी अकिंता मात्र फिनालेमध्ये पोहोचली आहे.

हेही वाचा… मराठमोळ्या अभिनेत्रीचं दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण, अनुभव सांगत म्हणाली, “मराठी व मल्याळम चित्रपटांमध्ये भरपूर…”

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्या घटस्फोटानंतर अंकिताच्या आयुष्यात विकी आला. दोघांनी एकमेकांना दोन ते तीन वर्षे डेट केले. त्यानंतर १४ डिसेंबर २०२१ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 17 vicky jain income earned lakhs from bigg boss show used ankita lokhandes fame dvr