‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वाची सध्या अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मुनव्वर फारुकी, मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, इशा मालवीय, अंकिता लोखंडे, विकी जैन या महत्त्वाच्या स्पर्धकांमध्ये विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू असल्याचं गेल्या काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे. अशातच आता ‘बिग बॉस’च्या घरात ‘फॅमिली वीक’ सुरू झाला आहे. दरवर्षी ‘फॅमिली वीक’च्या टास्कदरम्यान स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळते. अंकिता-विकी या सध्या चर्चेत असणाऱ्या जोडीला भेटण्यासाठी अभिनेत्रीची आई व सासूबाई (विकी जैनची आई) आल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकिता-विकीची भेट घेतल्यावर रंजना जैन यांनी पिंकव्हिलाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘बिग बॉस’च्या घरातील सध्याचं वातावरण व अंकिता-विकीच्या नात्यावर भाष्य केलं. नॅशनल टेलिव्हिजनवर सून व लेकामध्ये सध्या सुरू असणाऱ्या भांडणांबाबत अंकिताच्या सासूने स्पष्ट मत मांडलं आहे.

हेही वाचा : “३१ डिसेंबरला असं काय खास असतं?” गोव्यातील तुफान गर्दी पाहून शशांक केतकरचा सवाल; म्हणाला…

‘बिग बॉस’च्या १७ व्या पर्वात नवऱ्याबरोबर टोकाचे वाद झाल्यावर अंकिताने अनेकदा त्यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळालं. याबाबत अभिनेत्रीच्या सासूबाई म्हणाल्या, “अंकिताशी लग्न करणं हा विकीचा निर्णय होता. आमचा त्यांच्या लग्नाला पाठिंबा नव्हता. लग्नाचा निर्णय हा सर्वस्वी त्याचा होता, हे लग्न त्याला टिकवायचं आहे त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल आम्हाला काहीही देणंघेणं नाही. टीव्हीवर आम्ही सगळ्या गोष्टी पाहतो तरीही दोघांना काहीच बोलत नाही.”

हेही वाचा : इन्स्टाग्रामवर ओळख ते पहिली भेट! गौतमी देशपांडेने स्वानंदला आधी दिला होता नकार, ‘अशी’ आहे दोघांची फिल्मी लव्हस्टोरी

“‘बिग बॉस’ संपल्यावर त्या दोघांचं नातं सुधारण्यासाठी विकी जरुर प्रयत्न करेल असा मला विश्वास आहे. विकी-अंकिताने आता गेमपेक्षा जास्त त्यांच्या नात्यावर लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. त्यांच्यामधील भांडणं सगळ्यांनीच पाहिली पण, आता त्या दोघांचं प्रेम सगळ्यांना दिसलं पाहिजे. तेव्हाच त्यांच्या नात्यावर लोकांना विश्वास बसेल.” असं रंजना जैन यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 17 vicky jain mother reveals she was against his marriage with ankita lokhande says we did not support sva 00