Bigg Boss 17 Voting Result Update: वादग्रस्त लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो अशी ओळख असणाऱ्या ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा आज अखेरचा दिवस आहे. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सुरू झालेला १०० दिवसांचा प्रवास आज पूर्ण होणार आहे. रात्री १२ वाजता ‘बिग बॉस १७’चा विजेता घोषित होणार आहे. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी या टॉप पाच सदस्यांमधून एक सदस्य विजेता म्हणून सलमान खान घोषित करणार आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या चाहत्यांचं लक्ष महाअंतिम सोहळ्याकडे आहे. पण त्यापूर्वी ‘बिग बॉस १७’च्या विजेत्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कोणी अंकिता विजयी होणार म्हणतंय तर कोणी मुनव्वर, अभिषेक म्हणतंय, पण नेमका कुठला सदस्य विजेता होऊ शकतो? हे जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “जिन्यावरून ढकललं अन् मग…”, ९ वर्षांची असताना आयशा खानचा झाला होता विनयभंग, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली…

इंडियन एक्सप्रेसने ‘एक्स’वर घेतलेल्या पोलनुसार, मुनव्वर फारुकी हा ‘बिग बॉस १७’चा विजेता ठरेल. तर अभिषेक कुमार फस्ट रनअप आणि अंकिता लोखंडे सेकंड रनअप असेल. कारण पोलमध्ये मुनव्वरला ६४.६ टक्के इतकी मतं लोकांनी दिली आहेत. तर अभिषेकला १५.४ टक्के आणि अंकिताला १२ टक्के मतं लोकांनी दिली आहेत. तसेच मनारा ही चौथा स्थानावर असून तिला लोकांची ८.१ टक्के मतं मिळाली आहेत.

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री पोहोचली श्रेया बुगडेच्या नव्या रेस्टॉरंटमध्ये, फोटो पोस्ट करत म्हणाली, “बऱ्याच दिवसांनंतर…”

दरम्यान, ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा तब्बल ६ तास रंगणार आहे. संध्याकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत हा सोहळा असणार आहे. या सोहळ्यात सदस्यांचा जबरदस्त डान्स पाहायला मिळणार आहे. तसेच बॉलीवूडचे काही सेलिब्रिटी या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत.