‘बिग बॉस १७’ चा ग्रँड फिनाले रविवारी (२८ जानेवारी रोजी) पार पडला. या शोचा विजेता स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकी ठरला आहे. तर अभिषेक कुमार उपविजेता ठरला. हा शो नक्की कोण जिंकेल हे शेवटपर्यंत सांगण कठीणच होतं.

‘बिग बॉस १७’ चा विजेता मुनव्वर आपल्या राहत्या घरी परतला आहे. ‘ट्रॉफी डोंगरी ही आएगी,’ असं म्हणणारा मुनव्वर आता ट्रॉफीसह डोंगरीत पोहोचला आहे. त्याचं डोंगरीकरांनी जोरदार स्वागत केलं आहे.

हेही वाचा… Filmfare Awards 2024 : ‘ॲनिमल’साठी रणबीर कपूर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी!

‘विरल भयानी’ने शेअर केलेल्या या व्हिडीओत नागपाडा डोंगरी इथं जागोजागी मुनव्वरच्या स्वागतासाठी फलक लावलेले दिसत आहेत. चाहत्यांनी मुनव्वरच्या गाडीभोवती चांगलीच गर्दी केलेली दिसतेय. बिग बॉसच्या विजेतेपदाची ट्राॅफी घेऊन तब्बल ४ महिन्यांनी मुनव्वर आपल्या घरी जाणार पोहोचला आहे. त्यामुळे परिसरातील लोक आणि चाहते सगळेच त्याला भेटायला उत्सुक आहेत.

चाहत्यांची गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चाहते मुनव्वरला पाहण्यासाठी घरांच्या टेरेसवर चढल्याचं पाहायला मिळतंय. मुनव्वरने ट्रॉफी उंचावत सर्व चाहत्यांचे आभार मानते. मुनव्वरच्या स्वागतासाठी लोक रस्त्यावर जमल्याने प्रचंड गर्दीमुळे ट्रॅफिक जाम झालं आहे.