लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी ‘बिग बॉस १७’चा विजेता ठरला आहे. त्याला ‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीसह ५० लाखांचा चेक आणि Hyundai Creta गाडी बक्षीसस्वरुपात दिली गेली. ‘बिग बॉस १७’ विजेता ठरल्यापासून मुनव्वर सध्या चर्चेचा विषय झाला आहे. ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यापासून त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मग ते डोंगरीतले असो किंवा लेकाबरोबरचे सेलिब्रेशन असो, त्याचा प्रत्येक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशातच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये बांद्रातील एका रेस्टॉरंट बाहेर पडताना मुनव्वर चाहत्यांच्या गराड्यात अडकलेला दिसत आहे.
मुनव्वर फारुकीचा चाहत्या वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. फक्त सोशल मीडियावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. जेव्हा ‘बिग बॉस १७’ची ट्रॉफी घेऊन मुनव्वर डोंगरीत पोहोचला होता, तेव्हा चाहत्यांची एकच गर्दी केली होती. आता मुंबईतील मुनव्वरचा आणखी व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुनव्वरचा हा व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. नुकताच मुनव्वर बांद्रा येथील एका रेस्टॉरंटमध्ये डिनर करण्यासाठी गेला होता. त्यावेळी रेस्टॉरंट बाहेर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जेव्हा मुनव्वर रेस्टॉरंट बाहेर आला तेव्हा तो चाहत्यांच्या गराड्यात अडकला. यावेळी धक्काबुकी दरम्यान मुनव्वर खालीच पडला. सुरक्षा रक्षकांनी त्याला उचललं आणि गाडीत सुरक्षित बसवलं. मुनव्वरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
हेही वाचा – Video: अंकिता लोखंडेचा नावेदसह डान्स, ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “विकीने असं केलं असतं तर…”
दरम्यान, मुनव्वर हा लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन असला तरी तो उत्कृष्ट कविता, शायरी, रॅप लिहितो. त्याने ‘बिग बॉस १७’ पूर्वी ‘लॉकअप’ हा कंगना रणौतचा रिअॅलिटी शो जिंकला होता. तेव्हापासून तो घराघरात लोकप्रिय झाला होता.