Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील ईशा सिंह अफेअरच्या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. आणि अभिनेता शालीन भनोटबरोबर ईशाचं नाव जोडलं जात आहे. काही दिवसांपूर्वी वीकेंडच्या वारला सलमान खानने ईशाला विचारलं होतं की, तुझा घराबाहेर बॉयफ्रेंड आहे का? तेव्हा ईशा म्हणाली, “नाही.” मग सलमान म्हणाला की, तू शिल्पा म्हणाली होतीस, तुझा घराबाहेर बॉयफ्रेंड आहे वगैरे? ईशा म्हणाली, “नाही सर, कोणीही बॉयफ्रेंड नाही.” पुढे सलमानने विचारलं, “बॉयफ्रेंड नसेल. पण जवळचा मित्र असेल ना? जो मला ओळखतं असेल. जो खूप शांत, शालीन असेल. जेव्हा या घरात आलीस तेव्हा शेवटचा फोन कोणाला केला होतास?” हे ऐकताच ईशा लाजली आणि म्हणाली होती, “शालीन…तो माझा चांगला मित्र आहे.”
सलमान खानच्या या वीकेंड वारनंतर सोशल मीडियावर ईशा सिंह आणि शालीन भनोटचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यावरून चाहत पांडेच्या आईने देखील ईशाला विचारलं होतं. पण त्यावेळी ईशाच्या आईने चाहतच्या आईला खडेबोल सुनावलं. त्यानंतर ईशा थोडी नाराज झाली. मग ईशाच्या आईने तिला नीट समजावलं. असं असलं तरी सर्वत्र ईशा आणि शालीनच्या अफेअरच्या चर्चांना रंगल्या आहेत. पण, अखेर यावर शालीन भनोटने मौन सोडलं आहे.
अभिनेता शालीन भनोटने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शालीन भनोट म्हणाला, “हाय…मला खूप सारे मेसेज येत आहेत, ज्यामुळे मी वैतागलो आहे. बरेच लोक बरंच काही बोलतं आहेत. मी फक्त एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही माझ्याबाबत बोला, मला काहीच समस्या नाही. मला चांगलं वाटतं. पण, माझं नाव घेऊन एका मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं, मला अजिबात आवडत नाही. कृपया हे करू नका. एका मुलीच्या इज्जतीचा प्रश्न आहे. शिवाय मुलीच्या प्रतिष्ठेचा आणि आदराचा प्रश्न आहे. आपण मुलींचा सन्मान करू. त्यामुळे जे काही सुरू आहे, ते सर्व बंद करा.”
हेही वाचा – Bigg Boss 18: फॅमिली वीकमध्ये झालं एविक्शन, चुम दरांगच्या आईची खरी ठरली भविष्यवाणी, ‘हा’ सदस्य झाला घराबाहेर
हेही वाचा – विराट कोहलीचे चाहते आहेत नाना पाटेकर; म्हणाले, “तो लवकर बाद झाल्यास माझी भूक…”
दरम्यान, शालीन भनोटच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वात झळकला होता. गेल्या वर्षी त्याने ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभाग घेतला होता. तसंच शालीनने ईशा सिंहबरोबर ‘बेकाबू’ मालिकेत काम केलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd