Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात दिवाळीच्या मुहूर्तावर २ नोव्हेंबरला दोन वाइल्ड कार्ड सदस्यांची जबरदस्त एन्ट्री झाली. ‘स्प्लिट्सविला’च्या १५व्या पर्वात झळकलेले दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूर वाइल्ड कार्ड म्हणून सहभागी झाले आहेत. दोघं देखील दमदार खेळताना दिसत आहेत. पण, दिग्विजय आणि कशिशला येऊन १६ दिवस पूर्ण होत नाही तोवर आणखी एक-दोन नव्हे तर तीन वाइल्ड कार्ड सदस्यांनी एन्ट्री झाली आहे. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे.

‘कलर्स टीव्ही’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय या रिअ‍ॅलिटी शोमध्ये आपल्या हॉटनेसने आणि अदांनी घायाळ करणाऱ्या तीन वाइल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाली आहे. या वाइल्ड कार्ड सदस्यांना पाहून घरातील इतर सदस्य हैराण झाल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.

हेही वाचा – “एका काकूंनी त्यांच्या मुलीची ओळख करून दिली अन्…”; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखने सांगितला किस्सा, म्हणाला, “हा यश…”

निर्मात्यांनी या तिघींनी एन्ट्री खास अंदाजात केली आहे. प्रोमोच्या सुरुवातीलाच अदिती मिस्त्रीची ओळख करून दिली आहे. ती म्हणते, “मैं जब अंगडाई लेती हूं तो लहर उठ जाती है.” त्यानंतर एडिन रोजची झलक दाखवण्यात आली आहे. ती म्हणते, “मैं जब करवट लूंग कयामत आ जाएगी.” तसंच तिसरी वाइल्ड कार्ड सदस्य यामिनी मल्होत्रा म्हणते की, मैं सबकी प्यास बुझाती हूं. मग अदिती, एडिन, यामिनी एकत्र म्हणतात, “बिग बॉस क्या सारे जहान मैं सैलाब उठेगा.” अशा प्रकारे या तीन वाइल्ड कार्ड सदस्यांनी जबरदस्त एन्ट्री दाखवण्यात आली आहे.

अदिती, एडिन आणि यामिनीची एन्ट्री आणि डान्स पाहून घरातील सर्व सदस्य हैराण झाल्याच पाहायला मिळत आहे. यावेळी करणवीर मेहरा चुम दरांगचे डोळे बंद करतो. त्यानंतर करण म्हणतो, “आम्ही सहा मुलं जरा जास्तच नशीबवान नाहीये का?” हे ऐकताच सर्व मुली हसू लागतात. सध्या या तीन वाइल्ड कार्ड सदस्यांचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: “माणसं माझ्या पाया पडतात आणि म्हणतात…”, अप्पांनी सांगितलं ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे त्यांना काय मिळालं?

हेही वाचा – Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “कौटुंबिक कार्यक्रमात हे काय चाललंय?” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “अरे हा कौटुंबिक कार्यक्रम होताना ना?” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, आता हा कार्यक्रम कौटुंबिक वाटतं नाहीये. चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “टीआरपीसाठी कलर्स टीव्ही काहीपण करत आहे.”