Bigg Boss 18 : सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रीतिक्षित शो ‘बिग बॉस १८’ आता अवघ्या काही तासांत सुरू होणार आहे. ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व संपल्यापासून ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची चर्चा सुरू होती. सुरुवातीला सलमान खान तब्येतीच्या कारणास्तव हे पर्व होस्ट करणार नसल्याचं म्हटलं जात होतं. पण काही दिवसांपूर्वी सलमान खान ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा प्रोमो शूट करताना दिसला आणि या चर्चांना पूर्णविराम लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात झळकणाऱ्यांचे दमदार प्रोमो समोर येत आहेत. पहिला प्रोमो ९०च्या दशकातील बोल्ड आणि सेन्सेशनल क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिल्पा शिरोडकर यांचा आला. त्यानंतर मूळचा पंजाबचा असून त्याने जवळपास चार मालिका केल्या आहेत. पण एकेदिवशी निर्मात्याने या अभिनेत्याला सर्वांसमोर अपमानित करून सेटवरून थेट बाहेरचा रस्ता दाखवला. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेतील शेहजादा धामी याचा दुसरा प्रोमो आला.

हेही वाचा – Raat Jawaan Hai Promotion: भिन्न प्रकृतीची चारही माध्यमे वैशिष्ट्यपूर्ण; अभिनेत्री प्रिया बापटचे मत

मग ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील तिसऱ्या स्पर्धकाचा खुलासा झाला. ‘नाथ कृष्ण और गौरी की कहानी’ मालिकेतील अभिनेत्री चाहत पांडे हिचा दमदार प्रोमो प्रदर्शित झाला. सध्या ॲड. गुणरत्न सदावर्तेंचा प्रोमो चांगलाच चर्चेत आला आहे. या प्रोमोमध्ये “हम आते हैं डाकू की खानदान से” म्हणत गुणरत्न सदावर्ते एन्ट्री करताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला सलमान खानला हसू अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, याआधी एका गाढवाचा प्रोमो प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये एक गाढव ‘बिग बॉस १८’च्या ग्रँड प्रिमियरला चारा खाताना दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. पण हे पाळीव गाढव आहे; जे गुणरत्न सदावर्तेचं आहे. ‘मॅक्स’ असं या पाळीव गाढवाचं नाव असून सदावर्ते या गाढवाबरोबर ‘बिग बॉस’च्या घरात राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा – “अरबाज घाणेरडा गेम खेळला…”, घरात पुन्हा एन्ट्री घेतल्यावर वैभवचं विधान! जान्हवीला म्हणाला…

‘बिग बॉस १८’ची थीम

यंदाच्या ‘बिग बॉस’च्या पर्वात बरंच वेगळं काहीतरी पाहायला मिळणार आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यावर आधारित ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची थीम आहे. त्यामुळे नेमकं शोमध्ये काय असणार आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 advocate gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo pps