Bigg Boss 18 : ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वामुळे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते खूप चर्चेत आहेत. चार दिवसांमध्ये गुणरत्न सदावर्तेंनी आपल्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. १० ऑक्टोबरच्या भागात त्यांनी पत्नी जयश्री यांची आठवण येत असल्याचं जाहीर केलं. एवढंच नव्हे तर काही सदस्यांबरोबर त्यांच्या प्रेमाच्या आठवणी सांगितल्या.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “जेव्हा मी एमएचं शिक्षण घेत होतो. तेव्हा मी विवाहित नव्हतो. त्यावेळेस आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करत होतो. यावेळी आम्ही अजिंठा वेरुळची लेणी खूपदा फिरलो. मी तिथे इतका फिरलो आहे की, जेव्हा मी ‘बिग बॉस’च्या घरातल्या काही गोष्टी पाहतो ना तेव्हा मला त्या आठवणी जाग्या होतात. कारण त्या लेण्यांमध्ये अनेक तास मी आणि जयश्रीने घालवले आहेत. त्यावेळेस फक्त लायब्ररीमध्ये अभ्यास करणं. सुट्टीच्या दिवशी मुद्दाम खोट सांगणं की सुट्टी नाहीये आणि पुस्तक घेऊन फिरार व्हायचो. फिरायला जायचो. तिच्याकडे गाडी होती. तेव्हा तिच्या मागे घट्ट पकडून बसायचो. खूप मज्जा यायची.”

prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
chhagan bhujbal meets devendra fadnavis
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीसांना भेटून आल्यावर भुजबळ म्हणतात, “मी त्यांना सगळं सांगितलं आहे, त्यांनी ८-१० दिवस…”

हेही वाचा – Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस’मधील १७ सदस्यांवर पडले भारी, जेलमध्ये न जाण्यासाठी काय-काय केलं? जाणून घ्या…

त्यानंतर शिल्पा शिरोडकरने विचारलं, “लग्न किती वर्षांपूर्वी झालं?” यावर गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, १९९७-९८च्या दरम्यान प्रेम झालं आणि २००७मध्ये लग्न झालं. आता दोन मुलं आहेत. मला जयश्रीचा चेहरा पाहून दुसरं कोणीही आवडत आहे. सगळे चांगलेच दिसतात. पण मला दोघा नवरा-बायको व्यतिरिक्त काही आवडत नाही. दोघं खूप फिरतो. खूप भांडतो. ती कधी-कधी मला जबरदस्त मारते. तरीही मला वाईट वाटतं नाही. थोड्या वेळात विचार करतो की जयश्रीचं बरोबर आहे. ती पण माझ्यासारखीच डॅशिंग आहे. मारामारी, जेल वगैरे सगळं काही करते. मी सर्वात जास्त तिच्यावर प्रेम करतो.” मग उठून जोरजोरात सदावर्ते म्हणतात, “जयश्री आय लव्ह यू.”

हेही वाचा – Video : “आपली पायरी…”, धनंजय पोवार पुन्हा परतला कामावर, बऱ्याच दिवसांनी मालकाला पाहिल्यानंतर कर्मचारी म्हणाले…

दरम्यान, पहिल्याच आठवड्यात गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस’च्या घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यांच्यासह करण मेहरा, अविनाश मिश्रा, मुस्कान बामने आणि चाहत पांडे नॉमिनेट झाली आहे. आता या पाच सदस्यांपैकी कोण पहिल्याच आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घराचा निरोप घेतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader