Bigg Boss 18 : ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वामुळे अॅड. गुणरत्न सदावर्ते खूप चर्चेत आहेत. चार दिवसांमध्ये गुणरत्न सदावर्तेंनी आपल्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. १० ऑक्टोबरच्या भागात त्यांनी पत्नी जयश्री यांची आठवण येत असल्याचं जाहीर केलं. एवढंच नव्हे तर काही सदस्यांबरोबर त्यांच्या प्रेमाच्या आठवणी सांगितल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “जेव्हा मी एमएचं शिक्षण घेत होतो. तेव्हा मी विवाहित नव्हतो. त्यावेळेस आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करत होतो. यावेळी आम्ही अजिंठा वेरुळची लेणी खूपदा फिरलो. मी तिथे इतका फिरलो आहे की, जेव्हा मी ‘बिग बॉस’च्या घरातल्या काही गोष्टी पाहतो ना तेव्हा मला त्या आठवणी जाग्या होतात. कारण त्या लेण्यांमध्ये अनेक तास मी आणि जयश्रीने घालवले आहेत. त्यावेळेस फक्त लायब्ररीमध्ये अभ्यास करणं. सुट्टीच्या दिवशी मुद्दाम खोट सांगणं की सुट्टी नाहीये आणि पुस्तक घेऊन फिरार व्हायचो. फिरायला जायचो. तिच्याकडे गाडी होती. तेव्हा तिच्या मागे घट्ट पकडून बसायचो. खूप मज्जा यायची.”
त्यानंतर शिल्पा शिरोडकरने विचारलं, “लग्न किती वर्षांपूर्वी झालं?” यावर गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, १९९७-९८च्या दरम्यान प्रेम झालं आणि २००७मध्ये लग्न झालं. आता दोन मुलं आहेत. मला जयश्रीचा चेहरा पाहून दुसरं कोणीही आवडत आहे. सगळे चांगलेच दिसतात. पण मला दोघा नवरा-बायको व्यतिरिक्त काही आवडत नाही. दोघं खूप फिरतो. खूप भांडतो. ती कधी-कधी मला जबरदस्त मारते. तरीही मला वाईट वाटतं नाही. थोड्या वेळात विचार करतो की जयश्रीचं बरोबर आहे. ती पण माझ्यासारखीच डॅशिंग आहे. मारामारी, जेल वगैरे सगळं काही करते. मी सर्वात जास्त तिच्यावर प्रेम करतो.” मग उठून जोरजोरात सदावर्ते म्हणतात, “जयश्री आय लव्ह यू.”
दरम्यान, पहिल्याच आठवड्यात गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस’च्या घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यांच्यासह करण मेहरा, अविनाश मिश्रा, मुस्कान बामने आणि चाहत पांडे नॉमिनेट झाली आहे. आता या पाच सदस्यांपैकी कोण पहिल्याच आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घराचा निरोप घेतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.