Bigg Boss 18 : २९ ऑक्टोबरच्या वीकेंड वारमध्ये सलमान खानने एलिस कौशिकला एक धक्का देणारी गोष्ट सांगितली. काही दिवसांपूर्वी एलिसने अविनाश मिश्रा आणि ईशा सिंहला सांगितलं होतं की, तिचा बॉयफ्रेंड कुंवरने तिला लग्नाची मागणी घातली आहे. पण ‘बिग बॉस’च्या घराबाहेर एलिसचा बॉयफ्रेंड कुंवर माध्यमांना मुलाखत देऊन एलिसला लग्नाची मागणी न घातल्याचं सांगत आहे. फक्त तिच्यासारख्या मुलीशी लग्न करायला आवडेल, असं तो म्हणाला. पण एलिसने वेगळ्या पद्धतीने सांगितलं. हेच सलमान खानने वींकेड वारला एलिसला सांगितलं. ज्यामुळे एलिस खूप भावुक झाली.
त्यानंतर करणवीर मेहराला ‘तांडव रूम’मध्ये पाठवण्यात आलं. तेव्हा करणला या आठवड्यापासून ते अखेरच्या आठवड्यापर्यंत कोण-कोणत्या सदस्याला क्रमाने बाहेर काढावसं वाटतं ते सांगायचं होतं. करणने पहिलं नाव शहजादा धामीचं घेतलं. त्यानंतर तजिंदर बग्गा आणि सारा अरफीन खानचं नाव घेतलं.
चौथ्या क्रमाकांवर एलिसचं नाव घेऊन करणवीर म्हणाला, “ती छोट्या-छोट्या गोष्टींमुळे डिस्टर्ब होऊन जाते. कधीही नकारात्मक गोष्टी आधी लक्षात घेते. तिला कोणी नॉमिनेट केलं तर तिला आधी कारणं ऐकायची असतात. त्यानंतर कारणं सांगितल्यावर तिला जोपर्यंत समोरचा माणूस गिव्ह अप करत नाही तोपर्यंत ती त्या व्यक्तीच्या मागे लागून राहते. पण मुद्दाचं बोलत नाही. तिला फक्त जाणून घ्यायचं असतं हे का केलंय. त्यामुळे ती बराच वेळ डिस्टर्ब राहते. त्यामुळे ती मला कमकुवत खेळाडू वाटते.”
पुढे करणवीर म्हणाला, “आता तुला बाहेरून मेसेज आला तर तू त्यातली नकारात्मक गोष्ट घेऊन बसलीस. माझ्या मते ती सकारात्मक गोष्ट होती. त्या मुलाने सांगितलं, ‘हां, ती एक आहे जिच्याबरोबर मला लग्न करावंस वाटेल.’ तर ती चांगली गोष्ट आहे. पण, त्यातला तू नकारात्मक मुद्दा घेऊन बसलीस.”
करणवीरच्या याच मतामुळे एलिस चिडली असून तिने थेट त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ती म्हणाली, “मला करणचा जीव घ्यावासा वाटतोय.” तेव्हा अविनाशने विचारलं की, खेळात? यावर एलिस म्हणाली, “शारिरीक. मला त्याचा जीव घ्यायचा हे मी ऑन रेकॉर्ड म्हणते. जर तो मेला तर त्याची जबाबदारी मी घेईन. जग गेलं तेल लावतं. त्याने आतमध्ये (तांडव रूम) जाऊन माझ्या नात्याची खिल्ली उडवली आहे. बोलून कसा गेला होता आणि आतमध्ये जाऊन कसा बोलला. “
हेही वाचा – Video: ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने दिवाळीच्या मुहूर्तावर घेतली नवी आलिशान गाडी, पाहा व्हिडीओ
here you go! pic.twitter.com/L65GTYnTFg
— Jeevika Singh (@Jeevikas40) November 2, 2024
दरम्यान, एलिस कौशिकने करणवीर मेहराला दिलेली धमकी ऐकून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. अशा प्रकारे नॅशनल टेलिव्हिजनवर धमकी देणं गुन्हा आणि एलिसला त्याच्यासाठी उत्तर द्यावं लागेल, असं नेटकरी म्हणताना दिसत आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd