‘बिग बॉस १८’ ( Bigg Boss 18) चे पर्व सध्या मोठ्या चर्चेत आहे. नुकतीच या पर्वात दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूर यांची यांची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. सहभागी झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून या दोन स्पर्धकांनी इतर स्पर्धकांच्या नाकीनऊ आणल्याचे पाहायला मिळत आहे. याआधी कशिश कपूर आणि ईशा यांच्यामध्ये वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता दिग्विजय आणि अविनाश यांच्यामध्ये आता मोठे भांडण होताना दिसत आहे. बिग बॉस १८ एक धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

बिग बॉस’च्या घरात येताच दिग्विजयने अविनाशला दाखवला आरसा

‘कलर्स वाहिनी’ने बिग बॉसचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या अविनाश घरातील वस्तूंच्या चोरी संदर्भात बोलत आहे. तो रजतला म्हणतो, “रजत आताच्या मुद्द्यावर बोल. आता दिसलं ना कोणी चोरी केली, त्यावर काही नाही बोलणार. त्यावर सारा म्हणते, “हा पोपट इतके खोटं बोलतो ना. सगळ्यांचे जेवण लपवून ठेवले होते, त्यावेळी त्याला आठवलं नाही.” त्यानंतर दिग्विजय येतो आणि म्हणतो, “या घरात सगळ्यात आधी चोरी तू केली होतीस की आणखी कोणी केली होती?” त्यावर अविनाश म्हणतो, “मी खूप गोष्टी चोरल्या आहेत” दिग्विजय म्हणतो, “मग तू कशाला घाबरत आहेस?” अविनाश म्हणतो, “घाबरण्याची गोष्ट नाही.” दिग्विजय म्हणतो, “चोर चोराला बोलत आहे” त्यांच्यातील हा वाद पुढे वाढताना दिसत आहे. पुढे अविनाश म्हणतो, “आता तुला बिग बॉसच्या घरात येऊन तुला तीन-चार दिवस झालेत”, त्यावर दिग्विजय म्हणतो, “तुला दीड दिवस तीन-चार दिवसांसारखा वाटतोय का?” अशा प्रकारे दिग्विजय आणि अविनाश यांच्यामध्ये मोठे भांडण होताना दिसत आहे. त्यांच्या या भांडणादरम्यान सगळे स्पर्धक त्यांच्याकडे बघत असल्याचे दिसत आहे.

Bigg Boss 18 Rupali Bhosle fire on Vivian dsena
Bigg Boss 18: रुपाली भोसले भडकली ‘बिग बॉस १८’मधील ‘या’ सदस्यावर; सिद्धार्थ शुक्लाचा उल्लेख करत म्हणाली, “हा अहंकार…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Bigg Boss 18 ekta Kapoor slams on Vivian dsena watch promo
Bigg Boss 18: एकता कपूरने ‘बिग बॉस’च्या लाडक्या विवियन डिसेनाला चांगलंच झापलं, म्हणाली, “तुला लाँच केल्यानंतर मी…”
Bigg Boss 18 hrithik roshan life coach arfeen khan Evicted from salman khan
Bigg Boss 18: हृतिक रोशनच्या लाइफ कोचला दाखवला ‘बिग बॉस’च्या घराबाहेरचा रस्ता, ‘हे’ सदस्य झाले सुरक्षित
bigg boss marathi jahnavi killekar and suraj chavan
“घन:श्यामवर कोणीच विश्वास ठेऊ नये, तो प्रचंड…”, जान्हवीने स्पष्टच सांगितलं; सूरज चव्हाणच्या लग्नाबद्दल म्हणाली…
Aai kuthe kay karte fame madhurani prabhulakar got emotional sharing her old memories of the serial
‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, मधुराणी प्रभुलकर झाली भावुक; म्हणाली, “प्रत्येक स्त्रीचा आरसा असणारी भूमिका…”
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Bigg Boss 18 rajat dalal shayari on Vivian dsena group watch video
Bigg Boss 18: रजत दलालने शायरीतून विवियन डिसेनाच्या ग्रुपला लगावला टोला; नेटकरी म्हणाले, “एक नंबर भाई…”
कलर्स इन्स्टाग्राम

याआधी सलमान खानने अनेकदा अविनाशला त्याच्या वागण्याबद्दल खडसावल्याचे पाहायला मिळाले आहे. चाहत आणि अविनाश यांच्यामध्ये सतत कुरबुरी होताना दिसतात.आता बिग बॉसच्या घरात दिग्विजयची एन्ट्री झाल्यानंतर अविनाशला त्याच्या भाषेत उत्तर देणारा कोणीतरी आला आहे, असे प्रेक्षक सोशल मीडियावर म्हणताना दिसत आहे.

हेही वाचा: ‘अंधाधुन’ पाहिलाय? त्यापेक्षाही जास्त ट्विस्ट असलेले ‘हे’ चित्रपट आहेत OTT वर, वाचा यादी

दरम्यान, दिग्विजय राठोड आणि कशिश कपूर हे याआधी ‘स्प्लिट्सविला १५’ मध्ये सहभागी झाला होते. या शोमध्ये त्यांच्या खेळामुळे हे दोघेही मोठ्या चर्चेत आले होते. महत्वाची बाब म्हणजे, कशिश आणि दिग्विजय या पर्वात फायनलिस्ट बनला होते. मात्र अगदी शेवटच्या टप्प्यात कशिशमुळे हा शो जिंकण्याचे दिग्विजयचे स्वप्न भंगल्याचे पाहायला मिळाले होते. जेव्हा उर्फीने फायनलिस्ट असलेल्या सदस्यांना पैसे घेऊन या खेळातून माघार घेण्याची संधी दिली. त्यावेळी कशिशने पैसे निवडत खेळातून माघार घेतली. पार्टनर गेम असल्याने दिग्विजय आपोआप या खेळातून बाहेर झाला. त्यावेळी प्रेक्षकांनी दिग्विजयला मोठा पाठिंबा देत कशिशला ट्रोलदेखील केल्याचे पाहायला मिळाले. तेव्हापासून दिग्विजय आणि कशिश हे एकमेकांच्या विरूद्ध बोलताना दिसतात.जेव्हा बिग बॉसच्या घरात या दोघांची एन्ट्री झाली, तेव्हा या दोघांमध्ये वाद झाल्याचे दिसले. सलमान खानने डोक्याला हात लावल्याचे पाहायला मिळाले होते.हे दोघेही स्पर्धक खूप स्ट्रॉन्ग असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात आणखी कोणते धमाके होणार, या दोघांच्या येण्याने घरात काय बदलणार आणि पुन्हा या दोघांमध्ये मैत्री होऊ शकणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader