Bigg Boss 18 : ‘बिग बॉस’चं १८वं पर्व सुरू झाल्यापासून चांगलंच चर्चेत आहे. सतत ‘बिग बॉस’च्या घरात कोणत्या ना कोणत्या कारणावरून गोंधळ होतं आहे. सध्या यंदाच्या पर्वाचा दुसरा आठवडा सुरू आहे. पहिल्या आठवड्यात १९वा सदस्य म्हणून घरात गेलेला गाढवाला बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेल्या सदस्यांना दिलासा मिळाला. पण दुसऱ्या आठवड्यात अचानक दोन सदस्य बेघर झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१५ ऑक्टोबरच्या भागात वकील गुणरत्न सदावर्ते घराबाहेर झाले. न्यायालयात खटला चालू आहे. या खटल्यासाठी सदावर्तेंची उपस्थिती आवश्यक असल्यामुळे त्यांना काही वेळासाठी घराबाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’चे प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच आणखी एका सदस्याला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18 : एक, दोन नाही तर १० सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, ‘बिग बॉस’च्या घरात दुसऱ्या आठवड्यात मोठा गोंधळ

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातून घराबाहेर जाणारा दुसरा-तिसरा सदस्य कोणी नसून अविनाश मिश्रा आहे. याचा प्रोमो सध्या व्हायरल झाला आहे. ‘बिग बॉस तक’ या एक्स अकाउंटवर प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ घोषणा करत आहेत की, घरात राशन आणून भविष्य बदलायचं असेल तर आताच्या आता दोन घरातील सदस्यांना जेलमध्ये टाकावं लागेल किंवा एकाला घराबाहेर काढावं लागेल.

त्यानंतर जेलमध्ये जाण्यासाठी अविनाश मिश्राचं नाव घेतल्यामुळे तो इतर सदस्याबरोबर वाद घालताना दिसत आहे. अविनाश म्हणतो, “कोणामध्ये दम नाहीये. मी जेव्हा बोलतो तेव्हा सगळेजण बाहेर येता.” त्यानंतर अविनाश आणि चुम दरांगमधील वाद शिगेला पोहोचलेला पाहायला मिळत आहे. यामुळेच घरातील १० सदस्य अविनाशला घराबाहेर पाठवण्यासाठी निवडतात. त्यानंतर अविनाश घराबाहेर जाताना दिसत आहे. माहितीनुसार, अविनाश घराबाहेर झाला असला तरी त्याला सिक्रेट रुममध्ये ठेवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम जान्हवी किल्लेकरचा शाहरुख खान आणि काजोलच्या गाण्यावर सुंदर डान्स, पाहा व्हिडीओ

दरम्यान, ‘बिग बॉस १८’च्या दुसऱ्या आठवड्यात एकूण १० सदस्य नॉमिनेट झाले होते. अविनाशसह तजिंदर बग्गा, मुस्कान बामने, रजत दलाल, चाहत पांडे, श्रुतिका अर्जुन, हेमा शर्मा, शिल्पा शिरोडकर, करण वीर मेहरा, एलिस कौशिक या १० जणांमध्ये एक जण वीकेंडच्या वारला घराबाहेर जाणार आहे. पण, आता अविनाश अचानक बेघर झाल्यामुळे हे एलिमिनेशन होतंय की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 avinash mishra evicted from salman khan show pps