Bigg Boss 18 : ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील दुसऱ्या आठवड्यात सतत काहींना काहीतरी ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. आपल्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना १५ ऑक्टोबरला ‘बिग बॉस’च्या घराबाहेर काढण्यात आलं. न्यायालयातील प्रलंबित खटल्यांवरील सुनावणी दरम्यान गुणरत्न सदावर्ते उपस्थित असणे गरजेचं असल्यामुळे त्यांना घराबाहेर काढण्यात आलं. पण, त्यांच्या जाण्याने प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. गुणरत्न सदावर्तेंच्या लागोपाठ अविनाश मिश्रा घराबाहेर झाल्याचा प्रोमो सध्या व्हायरल होतं आहे. मात्र, अविनाश घराबाहेर नाही तर जेलमध्ये गेल्याचं आता समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘बिग बॉस’च्या घरात सध्या रेशनवर गोंधळ सुरू आहे. याच रेशनवरून १६ ऑक्टोबरच्या भागात ‘बिग बॉस’च्या घरात राडा झाला. ‘बिग बॉस’ने सांगितलं की, घरात रेशन आणून भविष्य बदलायचं असेल तर आताच्या आता पाच नॉमिनेट असलेल्या सदस्यांपैकी दोन घरातील सदस्यांना जेलमध्ये टाकावं लागेल किंवा एकाला घराबाहेर काढावं लागेल. यावेळी सर्व सदस्यांनी जास्तीत जास्त अविनाश मिश्रा, मुस्कान बामने, चाहत पांडे आणि तजिंदर पाल सिंह बग्गा यांचं नाव घेतलं. यावेळी अविनाश आपलं स्पष्ट मत मांडण्यासाठी पुढे गेला आणि मग राडाचं झाला. चुम दरांग हिच्याबरोबर अविनाशचं टोकाचं भांडण झालं. एवढंच नाहीतर अविनाश तिच्यावर धावून गेला. त्यामुळे घरातील सदस्यांनी थेट अविनाश घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नींना हिंदी ‘बिग बॉस’साठी झाली होती विचारणा, नकार देण्याचं कारण देत म्हणाल्या…

‘बिग बॉस तक’ने दिलेल्या माहितीनुसार, अविनाश मिश्रा ‘बिग बॉस’च्या घराबाहेर झालेला नाही. ‘बिग बॉस’ने त्याला जेलमध्ये ठेवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याला घरातील सदस्यांना रेशन देण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

हेही वाचा –‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा MMS झाला लीक, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; उत्तर देत म्हणाली, “एन्जॉय”

दरम्यान, ‘बिग बॉस १८’च्या दुसऱ्या आठवड्यात एकूण १० सदस्य नॉमिनेट झाले होते. अविनाशसह तजिंदर बग्गा, मुस्कान बामने, रजत दलाल, चाहत पांडे, श्रुतिका अर्जुन, हेमा शर्मा, शिल्पा शिरोडकर, करण वीर मेहरा, एलिस कौशिक या १० जणांना नॉमिनेट करण्यात आलं आहे.