Bigg Boss 18: चौथ्या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रिया नुकतीच पार पडली. या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये प्रत्येक सदस्याला दोन सदस्यांना घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट करायचं होतं. पण यामध्ये एक ट्विस्ट होता. ज्या सदस्याला नॉमिनेट केलं आहे; त्या सदस्याला करंटचा झटका दिला गेला. यावेळी चुम दरांगकडून एक चूक झाली आणि तिची इतर सदस्यांना नॉमिनेट करायची संधी हुकली. नेमकं काय घडलं? आणि कोण-कोण सदस्य नॉमिनेट झाले? जाणून घ्या…

नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा शहजादा कन्सेशन रूममध्ये गेला. शहजादाने एलिस आणि शिल्पा शिरोडकरला घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केलं. त्यानंतर प्रत्येक सदस्य कन्सेशन रूममध्ये जाऊन नॉमिनेट करत होता. यावेळी जेव्हा चुम दरांगला कन्सेशनरुममध्ये बोलावलं. तेव्हा चुमने जाण्याआधी नॉमिनेट करणाऱ्या सदस्यांची माफी मागितली. हेच ‘बिग बॉस’ला खटकलं. त्यामुळे ‘बिग बॉस’ने चुम दरांगकडून नॉमिनेट करण्याचा अधिकार परत घेतला. तिला कन्सेशनरूममध्ये जाताना रोखलं. यावेळी सर्व सदस्यांनी चुमला ‘बिग बॉस’ची माफी मागायला सांगितली. पण तिने माफी मागितली नाही. त्यानंतर पुढची नॉमिनेशन प्रक्रिया सुरळीत पार पडली.

Priya bapat sings kajra mohabbat wala 56 years old song
प्रिया बापटने गायलं ५६ वर्षांपूर्वीचं सुपरहिट बॉलीवूड गाणं! सुमधूर आवाजाचं सर्वत्र होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, “अप्रतिम…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
Veena Jagtap
“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना; अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या घरीही…”
Bigg Boss 18 Rupali Bhosle fire on Vivian dsena
Bigg Boss 18: रुपाली भोसले भडकली ‘बिग बॉस १८’मधील ‘या’ सदस्यावर; सिद्धार्थ शुक्लाचा उल्लेख करत म्हणाली, “हा अहंकार…”
Bigg Boss 18 hrithik roshan life coach arfeen khan Evicted from salman khan
Bigg Boss 18: हृतिक रोशनच्या लाइफ कोचला दाखवला ‘बिग बॉस’च्या घराबाहेरचा रस्ता, ‘हे’ सदस्य झाले सुरक्षित
Bigg Boss gave these big power to Chahat Pandey
Bigg Boss 18: ‘बिग बॉस’ने चाहत पांडेला दिली मोठी पॉवर, नेटकरी म्हणाले, “आता येणार मज्जा…”

हेही वाचा – Video: ‘भूल भुलैया ३’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान माधुरी दीक्षित आणि कार्तिक आर्यनचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

चौथ्या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. अविनाश मिश्रा, ईशा सिंह, एलिस कौशिक, श्रुतिका अर्जुन, अरफीन खान, शिल्पा शिरोडकर आणि शहजादा या सदस्यांना बहुमताने नॉमिनेट केलं आहे. आता या सदस्यांपैकी कोण घराबाहेर होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा – Video: सासुरवाडीत झाली गडबड, सूर्या आणि डॅडी प्यायले भांग अन् मग…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत नेमकं काय घडलं? वाचा

हेही वाचा – फुलेरामध्ये पुन्हा होणार ‘पंचायत’, चौथ्या सीझनच्या चित्रीकरणाला सुरुवात; जाणून घ्या काय असणार कथा अन् कधी होणार प्रदर्शित

दरम्यान, तिसऱ्या आठवड्यात घरातील दोन सदस्य बेघर झाले. तिसऱ्या आठवड्याच्या मधेच मुस्कान बामने हिला घरातील सदस्यांनी बहुमताने घराबाहेर केलं. त्यानंतर वीकेंड वारला प्रेक्षकांच्या मतानुसार नायरा बनर्जी एविक्ट झाली. आतापर्यंत ‘बिग बॉस १८’मधून चार सदस्य बेघर झाले आहेत. मुस्कान आणि नायराच्या आधी हेमा शर्मा, गुणरत्न सदावर्ते हे दोघं घराबाहेर झाले होते.

Story img Loader