Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. गेल्या आठवड्यात एका ऐवजी दोन जण घराबाहेर गेले. मुस्कान बामने ही सदस्यांच्या बहुमताने घराबाहेर झाली. तर प्रेक्षकांच्या मताने नायरा बनर्जी एविक्ट झाली. त्यानंतर चौथ्या आठवड्यात शहजादा धामी घराबाहेर झाला आहे. पण दुसऱ्या बाजूला दिवाळीच्या मुहूर्तावर ‘बिग बॉस’मध्ये मोठा धमाका झाला आहे. दोन वाइल्ड कार्ड सदस्यांनी एन्ट्री झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्प्लिट्सविला १५’ फेम दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूरची ‘बिग बॉस १८’च्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री झाली आहे. शोमध्ये एन्ट्री करताच दिग्विजय आणि कशिशमध्ये आरोप-प्रत्यारोप, तू तू मैं मैं पाहायला मिळालं. यावेळी सलमान खानने वैतागून दोघांना देखील शांत होऊन घरात प्रवेश करण्यास सांगितलं. अशातच आता ‘बिग बॉस १८’व्या पर्वात एक बदल झाला आहे.

हेही वाचा – Video: ‘वहिनी’ हाक मारताच लाजली निक्की तांबोळी, अरबाज पटेलबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

‘बिग बॉस’चा वीकेंड वार हा दर शनिवार, रविवार होतं असतो. पण आता वीकेंडचा वार शुक्रवारपासूनचं सुरू होणार आहे. शुक्रवार आणि शनिवारी सलमान खान होस्टिंग करणार आहे. तर रविवार स्पेशल होस्ट म्हणून रवि किशन येऊन सदस्यांची शाळा घेणार आहे. त्यामुळे रवि किशनने सलमान खानची जागा घेतल्याची ही चर्चा होती. पण, तसं काहीही झालेलं नाहीये. फक्त वीकेंड वारचा फॉरमॅट बदलला आहे. रवि किशनचा प्रोमो समोर आला आहे.

या प्रोमोमध्ये रवि किशन पोलिसाच्या वेशात बुलेटवरून ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री करताना दिसत आहे. त्यानंतर सदस्यांबरोबर रवि किशन भोजपूरी गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहेत. रवि किशनच्या येण्याने ‘बिग बॉस १८’च्या घरात आतिषबाजी होणार आहे.

हेही वाचा – Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : दुसऱ्या दिवशीही ‘सिंघम अगेन’ ‘भुल भुलैया ३’वर पडला भारी, तीन दिवसांतच १०० कोटींची कमाई करणार अजय देवगणचा चित्रपट

हेही वाचा – Video: ‘नवरा माझा नवसाचा २’ची जोरदार सक्सेस पार्टी, सचिन पिळगांवकरांनी सुप्रिया यांच्यासह ‘सत्या’ चित्रपटातील गाण्यावर केला जबरदस्त डान्स

दरम्यान, सध्या सलमान खान सातत्याने येणाऱ्या धमक्यांमुळे तगड्या सुरक्षेसह ‘बिग बॉस १८’चा वीकेंड वार चित्रीकरण करत आहे. पण वीकेंड वारमध्ये इतके बदल का केलेत? यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 bhojpuri superstar ravi kisha special host of thi season watch promo pps