Bigg Boss 18 : हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाला ६ ऑक्टोबरपासून दमदार सुरुवात झाली आहे. यंदाच्या पर्वात १८ सदस्यांसह एक गाढव सहभागी झालं आहे. पहिल्या दिवसापासून प्रत्येक सदस्याचं कोणत्या ना कोणत्या सदस्याशी खटके उडत आहेत. नुकतीच या पर्वातील पहिली नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. यावेळी गुणरत्न सदावर्तेंसह पाच सदस्य नॉमिनेट झाले.

९ ऑक्टोबरच्या भागात नॉमिनेशन प्रक्रिया पाहायला मिळाली. ‘मौत का फर्मान’ असं नॉमिनेशन प्रक्रियाचं नावं होतं. ‘मौत का फर्मान’ नावाच्या भिंतीवर सर्व १८ सदस्यांचे फोटो लावण्यात आले होते. या सदस्यांपैकी कोणत्या सदस्याचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास थांबवायचा आहे, त्याचं नाव सांगायचं होतं. ‘बिग बॉस’कडून एक दूत पाठवण्यात आला होता. जो सदस्यांनी बहुमताने घेतलेल्या नावाच्या फोटोवर बाण मारणार होता. तीन पेक्षा अधिक जणांनी ज्या सदस्याचं नाव घेतलं तो सदस्य नॉमिनेट होणार होता. त्याप्रमाणे सर्वात आधी चाहत पांडेचं नाव घेण्यात आलं. चाहतला सर्वाधिक १० सदस्यांनी नॉमिनेट केलं.

Bigg Boss 18 Edin Rose Yamini Malhotra is evicted from salman khan show after digvijay rathee evicted
Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीनंतर आणखी दोन सदस्य घराबाहेर; कशिश कपूर ढसाढसा रडत म्हणाली, “इथे प्रत्येकजण साप…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Bigg Boss 18 Digvijay Singh Rathee says who will win the show
Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीच्या मते करणवीर मेहरा नाही, तर ‘हा’ सदस्य होणार विजयी; म्हणाला…
Bigg Boss 18 Digvijay Rathee is EVICTED from salman khan show
Bigg Boss 18: फिनालेच्या चार आठवड्यांआधी अचानक ‘हा’ सदस्य घराबाहेर; शिल्पा शिरोडकर, ईशा सिंहला अश्रू झाले अनावर
Bigg Boss फेम कलाकारांचा नवीन शो सुरू होणार?
Bigg Boss फेम कलाकारांचा नवीन शो सुरू होणार? छोटा पुढारी घन:श्यामने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे मिळाली हिंट
Canadian-American actor Pamela Anderson was the highest-paid contestant in the history of Bigg Boss earning 2.5 crore for 3 days
Bigg Boss: सिद्धार्थ शुक्ला, विवियन डिसेना नाही तर ‘या’ स्पर्धकाला दिलेलं मोठं मानधन, फक्त तीन दिवसांचे मिळालेले २.५ कोटी
Bigg Boss 18 Shrutika Arjun is the new time god in salman khan show
Bigg Boss 18: विवियन डिसेना, करणवीर मेहरा नाही तर ‘हा’ सदस्य झाला नवा ‘टाइम गॉड’; दोन आठवडे नॉमिनेशनपासून राहणार सुरक्षित
Bigg Boss 18 Vivian Dsena Nominated Karan Veer Mehra and Shilpa Shirodkar total eight contested nominated 11 week
Bigg Boss 18: बायकोच्या सल्ल्यानंतर विवियन डिसेना बदलला, शिल्पा शिरोडकरला केलं नॉमिनेट; आठ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

हेही वाचा – रतन टाटांच्या निधनानंतर बॉलीवूड कलाकारांनी केला शोक व्यक्त, सलमान खानसह प्रियांका चोप्राने केल्या भावुक पोस्ट, म्हणाले…

त्यानंतर गुणरत्न सदावर्तेंना सहा सदस्यांनी नॉमिनेट केलं. यावेळी सदावर्ते आणि करण मेहरामध्ये वाद झाले. करण मेहरा सदावर्तेंना नॉमिनेट करत म्हणाला की, हे खेळात दिसत नाहीत. नुसते पडून आणि जास्त करून झोपून असतात. यावर गुणरत्न सदावर्ते उत्तर देत म्हणतात, “यांचं नाव काय आहे? हां, करण मेहरा. यांना मी जास्त पाहिलं नाही.” तेव्हा करण मेहरा म्हणतो, “तुमचंही नाव इथे कोणालाच माहित नव्हतं.” तेव्हा गुणरत्न सदावर्तेंचा पारा चढतो. ते म्हणतात की, नाही माहीत, ठीक आहे ना. डंके की चोट पे बोलत आहे. त्यावेळेस करण म्हणतो, “आता तुम्हाला डंके की चोट पे दाखवतो.”

हेही वाचा – Bigg Boss 18 : तिसऱ्याच दिवशी ‘व्हायरल भाभी’ने ‘बिग बॉस’चा मोडला मोठा नियम; गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “मी त्याची चिंता करत नाही…“

हेही वाचा – निक्की तांबोळीने अरबाजबद्दल अप्रत्यक्षरित्या दिली प्रेमाची कबुली, लाजत केली ‘ही’ कृती अन् म्हणाली, “हे प्रेम…”

दरम्यान, चाहत आणि गुणरत्न सदावर्तेंसह करण मेहरा, अविनाश मिश्रा, मुस्कान बामने हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या पाच सदस्यांपैकी पहिल्याच आठवड्यात कोण ‘बिग बॉस’च्या घराबाहेर होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader