Bigg Boss 18 : ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा आता तिसरा आठवडा सुरू झाला आहे. नुकताच वीकेंड वार पार पडला. गेल्या काही दिवसांपासून वीकेंड वारला सलमान खान गैरहजर राहणार असल्याचं म्हटलं जात होतं. कारण लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली गेल्यामुळे त्याच्या आजूबाजूला सुरक्षेचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सलमानला वाय प्लस सेक्युरिटी देण्यात आली आहे. त्यामुळेच सलमान वीकेंड वार करणार नसल्याची चर्चा होती. पण, सलमानने कमिटमेंट पाळली आणि तो वीकेंड वारला उपस्थित राहिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वीकेंड वारला आठवड्याभरात रेशनवरून झालेल्या वादावर सलमान बोलला. त्याने अरफीन खान आणि त्याची पत्नी सारा खानची चांगलीच कान उघडणी केली. याच दरम्यान हिंदी टेलिव्हिजनवरील संस्कारी सून म्हणून ओळखली जाणारी चाहत पांडेने सलमान खानसमोर आपली भावना व्यक्त केली. याचा प्रोमो सध्या खूप चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: अभिनेता शशांक केतकरने पुन्हा अस्वच्छतेबाबत उठवला आवाज; म्हणाला, “बघू निर्लज्ज कोण आहे”

‘कलर्स टीव्ही’ने सोशल मीडियावर चाहत पांडेचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये सलमान खान चाहतला विचारतो की, चाहत तू अनेकदा म्हणाली आहेस की, तुला लग्न करायचं आहे. तर तुला कसा नवरा पाहिजे. हे ऐकून चाहत लाजली आणि म्हणाली, करणवीर मेहरासारखा फिट पाहिजे. तो नेहमी फिट असतो. नेहमी जीम करतो. त्यानंतर घरातील सर्व सदस्य हसू लागतात.

पुढे श्रुतिका अर्जुन म्हणते, मला वाटतं, चाहतला करणवीर मेहरावर क्रश आहे. हे ऐकून चाहत लाजते आणि सलमान खानही हसायला लागतो. नंतर करणवीर मेहरा देखील स्वतःच्या भावना व्यक्त करतो. “चाहत, तू मला खरंच खूप आवडते”, असं करण म्हणतो. त्यामुळे आता येणाऱ्या भागात चाहत आणि करणचं हे नातं दृढ होतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण हा प्रोमो पाहून नेटकरी म्हणत आहेत की, ‘खतरों के खिलाडी १४’चा विजेता आता तिसऱ्यांदा लग्न करणार वाटतं.

हेही वाचा – कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपच्या आईचं निधन, वयाच्या ८६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची आनंद शिंदेंबरोबर झाली अचानक भेट, फोटो शेअर करत म्हणाला, “माझं बालपण…”

दरम्यान, गेल्या आठवड्यात एकूण १० जण नॉमिनेट झाले होते. तजिंदर बग्गा, मुस्कान बामने, रजत दलाल, चाहत पांडे, श्रुतिका अर्जुन, हेमा शर्मा, शिल्पा शिरोडकर, करण वीर मेहरा, एलिस कौशिक आणि अविनाश मिश्रा या सदस्यांपैकी हेमा शर्मा घराबाहेर झाली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 chahat pandey express her feelings front of salman khan watch video pps