Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा १३वा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात आतापर्यंत हटके नॉमिनेशन टास्क आणि नवीन वर्षाचं जोरदार सेलिब्रेशन पाहायला मिळालं. आता फॅमिली वीक सुरू झाला आहे. सदस्यांच्या कुटुंबातील मंडळी त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. त्यामुळे आता बराच ड्रामा पाहायला मिळत आहे. चाहत पांडेची आई ‘बिग बॉस’च्या घरात येताच अविनाश मिश्रा आणि रजत दलालवर भडकली. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.
‘कलर्स टीव्ही’च्या सोशल मीडियावर चाहत पांडेच्या आईचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये आईला पाहताच चाहत पांडे धावत येऊन तिला मिठी मारून जोरजोरात रडताना दिसत आहे. त्यानंतर चाहतची आई अविनाश मिश्राला म्हणाली, “तू ज्या प्रकारे चाहतबद्दल बोलला आहेस, तशी ती मुलगी नाहीये. आमचं कुटुंब तुला कधीच माफ करणार नाही.” त्यानंतर चाहतशी बोलताना तिची आई म्हणाली की, जेव्हा आम्ही तुला विचारलं होतं, तुझं आणि अविनाशचं पटतं का नाही? तेव्हा तू आम्हाला सांगितलं होतंस की, मला अविनाश आवडत नाही. कारण तो स्त्रीलंपट माणूस आहे.
त्यानंतर अविनाश चाहतला म्हणाला की, चाहत तू सेटवरील इतर गोष्टी सांगितल्या? तेव्हा चाहत म्हणाली, काही नाही आणि इशारा करत म्हणाली, नको सांगू. पुढे चाहतची आई रजत दलालला सुनावताना दिसत आहे. ती म्हणते, “रजत तू चाहतचा वापर करून तिला फेकून देतोस.” चाहतच्या आईचा हा प्रोमो सध्या खूप चर्चेत आला आहे.
हेही वाचा – Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या घरात आले ज्योतिषी, सदस्यांना दिली हटके नावं, वाचा टॉप-१०ची भविष्यवाणी
दरम्यान, १३व्या आठवड्यात अविनाश मिश्रा, ईशा सिंह, विवियन डिसेना, चाहत पांडे, कशिश कपूर, रजत दलाल आणि श्रुतिका अर्जुन घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला अवघे काही आठवडे बाकी आहेत. त्याआधी या सात सदस्यांमधून कोण घराबाहेर होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.