Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा १४वा आठवडा सुरू झाला आहे. नुकतीच कशिश कपूर घराबाहेर झाली आहे. प्रेक्षकांच्या कमी मतांमुळे कशिश एविक्ट झाली. त्यामुळे आता ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात नऊ सदस्य बाकी राहिले आहेत. विवियन डिसेना, करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, चाहत पांडे, चुम दरांग, अविनाश मिश्रा, ईशा सिंह, श्रुतिका अर्जुन आणि रजत दलाल हे टॉप-९ सदस्य आहेत. यामधील कोणते सदस्य अंतिम आठवड्यापर्यंत पोहोचतात याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण अशातच चाहत पांडेच्या आईने ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांना खुलं आव्हान देत २१ लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

अलीकडेच ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा ‘फॅमिली वीक’ झाला. यावेळी चाहत पांडेच्या आईने अविनाश मिश्राला ‘स्त्रीलंपट’ असल्याचा टॅग दिला. तसंच तिच्या आईने दावा केला होता की, चाहतने कोणाला डेट केलं नाही आणि ती कोणाला डेट करणारही नाही. माझ्या इच्छेनुसार ती लग्न करेल. यावरून वीकेंडच्या वारला सलमान खानने एक फोटो दाखवत चाहतबाबत खुलासा केला. या फोटोमध्ये तिच्याबरोबर एक केक होता. ज्यावर लिहिलं होतं, ‘नात्याला ५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने शुभेच्छा…माझं प्रेम.’ याशिवाय सलमानने चाहत एका गुजराती मुलाला डेट करत असल्याची हिंट दिली. तेव्हापासून चाहत पांडे नातेसंबंधामुळे खूप चर्चेत आली आहे. यावरून चाहतच्या आईने ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांना खुलं आव्हान दिलं आहे.

Bigg Boss 18 kashish Kapoor slam on Shilpa Shirodkar
Bigg Boss 18: “हीच तोंडपण बघायचं नाही…”, घराबाहेर येताच कशिश कपूरची शिल्पा शिरोडकरवर टीका, म्हणाली…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor wedding
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकलेल्या अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! पत्नी सुध्दा आहे अभिनेत्री, ‘या’ लोकप्रिय मालिकेत केलंय काम
Bigg Boss 18 Chahat Pandey date gujarati boy but her mother is strongly averse to their relationship
Bigg Boss 18: चाहत पांडे कोणाला करतेय डेट? ‘बिग बॉस’मध्ये जाण्याआधी आईला करून दिलेली ओळख
what prithvik pratap wife prajakta vaikul do
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”
Rohit Roy recalls surprising daughter Kiara
अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”
bigg boss marathi jahnavi killekar and suraj chavan
“घन:श्यामवर कोणीच विश्वास ठेऊ नये, तो प्रचंड…”, जान्हवीने स्पष्टच सांगितलं; सूरज चव्हाणच्या लग्नाबद्दल म्हणाली…
Bigg Boss 18 ekta Kapoor slams on Vivian dsena watch promo
Bigg Boss 18: एकता कपूरने ‘बिग बॉस’च्या लाडक्या विवियन डिसेनाला चांगलंच झापलं, म्हणाली, “तुला लाँच केल्यानंतर मी…”

हेही वाचा – Bigg Boss 18: चाहत पांडे कोणाला करतेय डेट? ‘बिग बॉस’मध्ये जाण्याआधी आईला करून दिलेली ओळख

एका मुलाखतीमध्ये चाहतच्या आईने सांगितलं की, चाहतने एका सहकलाकाराच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने केक ऑर्डर केला होता. एका पडद्यामागे ८० लोक काम करत असतात. यावेळी प्रत्येकाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस साजरा केला जातो. त्यामुळे चाहतने इतर कोणासाठी तो केक ऑर्डर केला होता. त्यानंतर चाहतची आई ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांना आव्हान देत म्हणाली, “जर ‘बिग बॉस’ने चाहतच्या बॉयफ्रेंडचा फोटो आणि नाव शोधून काढलं तर मी २१ लाखांचं बक्षीस देईल.”

हेही वाचा – अलका कुबल यांनी सांगितली पायलट लेकीबरोबरच्या ‘या’ फोटोमागची गोष्ट, म्हणाल्या, “जेव्हा विमान थांबलं…”

चाहत पांडेची आई अविनाश मिश्राला काय म्हणाली होती?

चाहत पांडेची आई अविनाश मिश्राला म्हणाली होती की, तू ज्या प्रकारे चाहतबद्दल बोलला आहेस, तशी ती मुलगी नाहीये. आमचं कुटुंब तुला कधीच माफ करणार नाही. त्यानंतर चाहतशी बोलताना तिची आई म्हणाली होती, “जेव्हा आम्ही तुला विचारलं होतं, तुझं आणि अविनाशचं पटतं का नाही? तेव्हा तू आम्हाला सांगितलं होतंस की, मला अविनाश आवडत नाही. कारण तो ‘स्त्रीलंपट’ माणूस आहे.” एवढं सगळं होऊनही अविनाशने चाहत पांडेच्या आईची माफी मागितली. पण, हा वाद इथेच संपला नाही. याचे पडसाद वीकेंडच्या वारला उमटले.

Story img Loader