Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात नुकताच झालेला वीकेंड वार खूपच जबरदस्त होता. सलमान खानने घरातल्या काही सदस्यांची जेवढी शाळा घेतली तेवढंच हसवलं. शनिवारी ( १९ ऑक्टोबर ) सलमान खानने अरफीन खानला खूप झापलं. अरफीनच्या प्रोफेशनवर अविनाश मिश्राने भाष्य केलं होतं. त्यानंतर अरफीन आणि त्याची पत्नी सारा खान सतत नाराजी व्यक्त करत होते. यावरून सलमानने अरफीनची कानउघडणी केली. यावेळी सलमानने साराबरोबर अजिबात बातचित केली नाही. पण रविवारी, ( २० ऑक्टोबरला ) सलमान साराबरोबर हसताना, विनोद करताना दिसला. यावेळी चाहत पांडेने थेट भाईजानला लग्नाची मागणीच घातली. तेव्हा सलमानने तिला काय उत्तर दिलं? जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारच्या वीकेंड वारला सलमान खानने चाहतला विचारलं की, जेव्हापासून तू ‘बिग बॉस’च्या घरात आली आहेस. तेव्हापासून तू अनेकदा म्हणाली आहेस की, तुला लग्न करायचं आहे. तर मग तुला ज्या मुलाबरोबर लग्न करायचं आहे, त्याच्यामध्ये कोणत्या क्वालिटी पाहिजे. त्यावर चाहत विचारते की, तुम्हाला घरात असलेल्या पुरुषांमधील क्वालिटीबाबत सांगायचं आहे का? त्यानंतर चाहतने सर्वात आधी नाव करणवीर मेहराचं घेत म्हणाली, जसा करणवीर जिम करतो. तसा साथीदार मला पाहिजे, जो माझी काळजी घेईल. हे ऐकून सलमान खान अजूनच चाहतची मस्करी करतो.

हेही वाचा – रिद्धिमा कपूरचा पती आहे तरी कोण? २५२ कोटींची कंपनी सांभाळणाऱ्या रणबीरच्या मेहुण्याबद्दल जाणून घ्या…

पुढे चाहते म्हणते, “जोडीदाराचे केस विवियन सारखे पाहिजे.” मग करण आणि चाहतवरून घरातील इतर सदस्य मस्करी करू लागतात. त्यानंतर करण चाहतला म्हणतो, “अजूनही फ्रेममध्ये लोक आहेत. सलमान खानसरांसारखी कोणती क्वालिटी पाहिजे?” तेव्हा चाहत सलमानकडे बघून म्हणते की, सर, तुम्हीच माझ्याशी लग्न करा. यावर सलमान म्हणतो, “जितक्या तू क्वालिटी सांगितल्या आहेस ना, त्यापैकी एकही क्वालिटी माझ्याकडे नाहीये. स्पेशली तुझ्या आईचं आणि माझं अजिबात जमणार नाही.” मग चाहत म्हणते की, “सर, त्यावर नंतर बोलू. सगळं काही निस्तरेलं. लग्न झाल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल.”

हेही वाचा – Bigg Boss 18: अडीच कोटींच्या फ्लॅटच्या बदल्यात मुलाला भेटण्याची परवानगी अन्…; हेमा शर्मावर पूर्वाश्रमीच्या पतीने केले गंभीर आरोप

दरम्यान, गेल्या आठवड्यात एकूण १० जण नॉमिनेट झाले होते. तजिंदर बग्गा, मुस्कान बामने, रजत दलाल, चाहत पांडे, श्रुतिका अर्जुन, हेमा शर्मा, शिल्पा शिरोडकर, करण वीर मेहरा, एलिस कौशिक आणि अविनाश मिश्रा या सदस्यांपैकी हेमा शर्मा घराबाहेर झाली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 chahat pandey proposed marriage to salman khan pps