Bigg Boss 18: ‘बिग बॉस’चं १८वं पर्व सुरू होऊन आज महिना झाला आहे. ६ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाला सुरुवात झाली. एकूण १८ सदस्य सहभागी झाले होते. आतापर्यंत पाच सदस्य घराबाहेर झाले आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी घरात दोन वाइल्ड कार्ड सदस्यांची धमाकेदार एन्ट्री झाली. दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूर हे दोघं वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता ‘बिग बॉस’च्या घरात एकूण १५ सदस्य आहेत.
सध्या ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा पाचवा आठवडा सुरू आहे. नुकतीच पाचव्या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. या नॉमिनेशन प्रक्रियेत ‘बिग बॉस’ने सदस्यांना नॉमिनेट करण्याचे संपूर्ण अधिकार टाइम गॉड म्हणजेच विवियन डिसेनाला दिले. नॉमिनेशन प्रक्रियेची जंगली ऑक्टोपसची थीम होती. या जंगली ऑक्टोपसची भूक शांत करण्यासाठी विवियनला आठ सदस्यांचा बळी चढवायचा होता. यावेळी विवियन पूर्णपणे पक्षपाती खेळला. त्याने आपल्या ग्रुपमधील आणि फेव्हरट सदस्यांना नॉमिनेट होण्यापासून सुरक्षित ठेवलं.
सर्वात आधी विवियनने रजत दलालला नॉमिनेट केलं. त्यानंतर चाहत पांडे, श्रुतिका अर्जुन, सारा अरफीन खान, अरफीन खान, करण मेहरा, तजिंदर बग्गा आणि चुम दरांग या आठ जणांना घराबाहेर जाण्यासाठी विवियनने नॉमिनेट केलं. पण यादरम्यान ‘बिग बॉस’ने एक ट्विस्ट आणला. ‘बिग बॉस’ने एकूण आठ सदस्यांपैकी चार जणांना सुरक्षित करण्याचा अधिकार घरातील सदस्यांना दिला. ज्या सदस्याला चार पेक्षा अधिक जण मतं देतील तो सुरक्षित होणार होता.
घरातील सदस्यांनी चार पेक्षा अधिक मतं देऊन रजत दलाल, करणवीर मेहरा, चुम दरांग, श्रुतिका अर्जुन या चार जणांना सुरक्षित केलं. त्यामुळे आता चाहत पांडे, सारा अरफीन खान, अरफीन खान, तजिंदर बग्गा या चार सदस्यांवर घराबाहेर जाण्यासाठी टांगती तलवार आहे.
दरम्यान, आतापर्यंत ‘बिग बॉस १८’च्या घरातून गुणरत्न सदावर्ते, हेमा शर्मा, मुस्कान बामने, नायरा बनर्जी, शहजादा धामी हे पाच सदस्य एलिमिनेट झाले आहेत. आता घराबाहेर जाण्यासाठी सहावा नंबर कोणत्या सदस्याचा लागतोय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.