Bigg Boss 18 : हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात गेल्या आठवड्यापासून रेशनवरून होणारा वाद अधिक वाढला आहे. कारण आहे अविनाश मिश्रा. अविनाशला जेलमध्ये गेल्यापासून रेशन वाटपाचा अधिकार देण्यात आला आहे. पण अविनाश रेशन वाटप करताना सतत वाद घालताना दिसत आहे. २३ ऑक्टोबरच्या भागात त्याने थेट जाहीर केलं की, तो त्याच्या फेवरेट सदस्यांनाच अधिकच रेशन देणार. यामुळेच सध्या ‘बिग बॉस’च्या घरातील रेशनवरील वाद वाढला आहे. अशातच या रेशनवरून चाहत पांडेने एक पाऊल उचललं. ते म्हणजे तिने पहाटे ५ वाजता उठून झोपलेल्या अविनाश मिश्रावर पाणीचं फेकलं; ज्यामुळे अविनाश खूप भडकला. त्यानंतर अविनाश आणि चाहतमध्ये टोकाचे वाद झाल्याचं पाहायला मिळालं. अविनाश चाहतच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलला. म्हणून सध्या दोघं खूप चर्चेत आले आहेत.
अविनाश आणि चाहतच्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. पाणी फेकल्यानंतर अविनाश चाहतला म्हणाला, “मी चाहतबरोबर जवळपास २ वर्ष मालिका केली आहे. त्यामुळे मला माहितीये की, तिच्या मनात माझ्याविषयी खूप प्रेम आहे. मी तिची नॅशनल टेलिव्हिजनवर माफी मागतो. तू आता दुसरा मुलगा बघ. माझं अटेंशन मिळवण्यासाठी हे करू नकोस. तू म्हणाली होती, करणची बॉडी चांगली आहे. पण, तुला मला सतत भिजवून ओल्या केसांमध्ये किंवा कपडे काढून पाहायची इच्छा असेल. तर हे सगळं करू नकोस. माझं अटेंशन मिळवण्यासाठी हे सगळं प्लीज करू नकोस.”
हेही वाचा – Video: सुव्रत जोशीने आणली ‘सवलत माझी लाडकी योजना’, नेमकी काय आहे? जाणून घ्या…
अविनाश मिश्रा जे काही बोलला ते सगळं चाहतने ऐकून घेतलं आणि घराबाहेर जाऊन रडू लागली. तितक्यात करणवीर मेहरा बाहेर येऊन तिला म्हणाला, “तू बोल. त्याने तुझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला आहे.” त्यानंतर चाहत घरात आली आणि म्हणाली, “अविनाश मिश्रा माझ्या पायाची धूळ आणि चप्पलदेखील तुझ्यावर प्रेम करणार नाही. तू जे नॅशनल टेलिव्हिजनवर माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला आहेस. तू एका मुलीची प्रतिमा खराब करत आहेस की, मी तुझ्यावर प्रेम करते. तुझ्यासारख्या विचाऱ्यांच्या मुलांवर आणि त्यांच्या चेहऱ्यावर मी थुंकते. माझ्या पायाची धूळ आणि चप्पलदेखील तुझ्यासारख्या विचाऱ्यांच्या मुलांवर प्रेम करू शकत नाही.”
हेही वाचा – Video: खुशबू तावडेच्या लेकीचा नामकरण सोहळा घरीच साध्या पद्धतीने पडला पार, तितीक्षाने व्हिडीओ केला शेअर
हेही वाचा – Video : “बिग बॉस मराठीमध्ये तुला काय झालेलं?” निखिल दामलेचा जबरदस्त डान्स पाहून नेटकरी झाले थक्क, म्हणाले…
दरम्यान, या वादानंतर अविनाश मिश्रावर प्रेक्षक टीका करताना दिसत आहे. त्याला ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर काढण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे या वादावर येत्या वीकेंड वारला सलमान खान काय म्हणतोय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.