Bigg Boss 18: ‘बिग बॉस’चं १८वं पर्व दिवसेंदिवस रंजक होतं चाललं आहे. २४ डिसेंबरच्या भागात नव्या ‘टाइम गॉड’च्या उमेदवारीसाठी टास्क पार पडला. यावेळी चुम दरांग नवी ‘टाइम गॉड’ झाली. पण अवघ्या काही तासांत ‘बिग बॉस’ने तिची ‘टाइम गॉड’च्या पदावरून हकालपट्टी केली. नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

२४ डिसेंबरच्या भागात, श्रुतिका अर्जुनचा ‘टाइम गॉड’चा कार्यकाळ सुरू असताना सतत सदस्य झोपताना दिसले. तीनदा कोंबडा आरवला. पण श्रुतिकाने कोण झोपलं होतं? याची चौकशी सुद्धा केली नाही. त्यामुळे ‘बिग बॉस’ भडकले. त्यांनी श्रुतिकाला चांगलंच सुनावलं आणि तिची ‘टाइम गॉड’च्या पदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर नव्या ‘टाइम गॉड’च्या उमेदवारीचा टास्क पार पडला. या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याला स्नो मॅन तयार करायचा होता. या टास्कची संचालक श्रुतिका अर्जुन होती. तिला प्रत्येक फेरीमध्ये चांगला स्नो मॅन बनवलेल्या दोन सदस्यांना विजयी घोषित करायचे होते. मग या दोन सदस्यांना अ‍ॅक्टिव्हिटी रुममध्ये जाऊन आठवड्याभराच्या रेशनसह टाइम गॉडची उमेदवारी बीटच्या माध्यमातून खरेदी करायची होती. ‘बिग बॉस’ने २० लाख रुपये दिले होते.

हेही वाचा – केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार

या टास्कच्या पहिल्या फेरीत श्रुतिकाने चुम आणि करणला विजय घोषित केलं. त्यानंतर चुम-करण अ‍ॅक्टिव्हिटी रुममध्ये गेले. यावेळी चुमने ‘टाइम गॉड’ होण्यासाठी बिग बॉसने दिलेले सर्व पैसे बीटमध्ये लावले. फक्त एक रुपया कमी होता, जो करणला मिळाला. त्यामुळे सर्वाधिक बीट लावल्यामुळे चुम दरांग ‘टाइम गॉड’ झाली. पण यामुळे आठवड्याभराच रेशनसह घरातील असलेलं सर्व रेशन देखील गमावालं. तेव्हा घरात एकच गोंधळ झाला.

हेही वाचा – मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेने लग्नाचा पहिला वाढदिवस ‘असा’ केला साजरा, पाहा फोटो

‘बिग बॉस’ने चुम ‘टाइम गॉड’ होताच आदेश दिला की, घरातील सर्व रेशन स्टोअर रुममध्ये ठेवा. त्याप्रमाणे चुम आणि करणने रेशन स्टोअर रुममध्ये ठेवलं. पण यावेळी संतापलेल्या सारा अरफीन खानने रेशन चोरलं. ती रेशन द्यायलाचं मागत नव्हती. त्यामुळे काही वेगळानंतर ईशा, चाहत, रजत, विवियन सर्वजण स्टोअर रुममध्ये ठेवलेलं रेशन घेऊन जेवण बनवू लागले. ही परिस्थिती चुमच्या हाताबाहेर गेली होती. ती कोणालाही रोखू शकली नाही. त्यामुळे अखेर ‘बिग बॉस’ने कठोर पाऊल उचललं. ‘बिग बॉस’ने दिलेल्या आदेशाचं पालन चुम दरांग करून शकली नाही म्हणून तिची ‘टाइम गॉड’ पदावरून हकालपट्टी करून टाकली. त्यामुळे आता चुम व्यतिरिक्त घराचा नवीन ‘टाइम गॉड’ कोण होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा – Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा

दरम्यान, गेल्या आठवड्यात मिड वीक एविक्शन आणि डबल एविक्शन पाहायला मिळालं. मिड वीक एविक्शनमध्ये दिग्विजय सिंह राठी घराबाहेर झाला. त्यानंतर डबल एविक्शनमध्ये एडिन रोज, यामिनी मल्होत्रा बेघर झाल्या.

Story img Loader